बाणेर :
स्वातंत्र्यदिनानिमित्त कै.सोपनराव बाबुराव कटके प्राथमिक विध्यालय, बाणेर येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे मा.अजित पारसणीस सर (मा. पोलिस महासंचालक), श्री.राहुलदादा उत्तम बालवडकर, मा. नगरसेविका सौ. ज्योतिताई कळमकर, मा.नगरसेविका सौ. स्वप्नालीताई सायकर , श्री.नितीन कळमकर सर, सौ. पूनमताई विधाते, सौ.प्राजक्ता ताम्हाणे हे मान्यवर उपस्थित होते.
तसेच स्वातंत्र्यदिनानिमित्त बालेवाडी येथील कै.बाबुराव (शेठजी) गेनुजी बालवडकर प्राथमिक विध्यालय, येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे मा.प्रसन्न चोबे(व्यवस्थापक टाटा मोटर्स), श्री. राहुलदादा बालवडकर, प्रकाशतात्या बालवडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटना मित्रपरिवार, सौ. पूनमताई विधाते, मनोज बालवडकर पाटील, चेतन बालवडकर, दिलीपतात्या बालवडकर, राघुनाना बालवडकर, अनिल तात्या बालवडकर, आनंदा कांबळे( पोलिस पाटील) आदि मान्यवर उपस्थित होते.
या वेळी बालेवाडी येथील शाळेच्या नवीन वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुलदादा उत्तम बालवडकर यांनी ७०० विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त मोफत वह्या वाटप केल्या.
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..