पिरंगुट :
आपल्या ७८ वा स्वातंत्र्य दिन पेरीविंकल मध्ये उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्री. संजय वाल्हेकर सर, प्रेसिडेंट गुरुदत्त ट्रस्ट, योगशिक्षक शंकरराव आव्हाळे, सुप्रसिद्ध किर्तनकार सायलीताई देशमुख , पेरीविंकल समूहाच्या संचालिका रेखा बांदल मॅडम आणि संचालक संदीप ढमढेरे सर, पिरंगुट शाखेचे मुख्याध्यापक डॉ. अभिजित टकले सर, शाखेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होता.
ध्वज पूजन करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झेंडा वंदन पार पडले. राष्ट्रगीत आणि झेंडागीत गायन झाल्या नंतर NCC मधील विद्यार्थ्यांनी ध्वजाला सलामी दिली. विद्यार्थी व विद्यार्थिनींचे दिमाखदार संचलन झाले.
निवडक विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त भाषणे झाली. लहानग्यांनी अतिशय तयारीने सादर केलेले गीत उपस्थितांची दाद मिळवून गेले. एका नृत्य नाटिकेतून देशप्रेम व समाजसेवा या गुणांचे महत्त्व सांगितले गेले. शाळेत इयत्ता निहाय चित्रकला स्पर्धा, गायन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. वेशभूषा स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांनी स्वातन्त्र्य सैनिकांच्या नुसत्या वेशभूषाच केल्या नाहीत, तर त्यांनी त्या त्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या नेत्यांची माहितीही साभिनय सादर केली. यातही ऐतिहासिक पात्रांची इयत्ता निहाय विभागणी केल्यामुळे या कार्यक्रमाला विशेष उठाव मिळाला. विद्यार्र्थ्यांनी तयारीने त्यात भाग घेऊन आपाल्या कला कौशल्याचे दर्शन घडवले. निवडक चित्रांचे छोटेखानी प्रदर्शनही भरवण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी कुतुहलाने प्रदर्शनाला भेट दिली, आणि विद्यार्थ्यांचे कौतुकही केले.
प्रसिद्ध किर्तनकार सायलीताई देशमुख यांनी आपल्या संत परंपरेच्या अभ्यासु वृत्तीने आजच्या वैज्ञानिक युगातील विद्यार्थ्यांना शिक्षण आणि अध्यात्मिक परंपरा यांच्यात सांगड घालत त्यांनी केलेले मार्गदर्शन विद्यार्थ्यांना खूपच भावले.
गुरुदत्त ट्रस्टचे प्रेसिडेंट संजय वाल्हेकर यांनीही स्वातंत्र्य सैनिकांनी घेतलेल्या कष्टाचे महत्त्व अधोरेखित करून योगासने आणि शारीरिक तंदुरुस्ती विद्यार्र्थी वर्गाला अभ्यासात एकाग्रता साधण्यासाठी कशी आवश्यक आहे हे समजावून सांगितले.
योगशिक्षक शंकरराव आव्हाळे यांनी पंचाहत्तर वर्षांच्या वयात तरुणालाही लाजणाऱ्या आविर्भावात सादर केलेली योगासनांची प्रात्यक्षिकं उपस्थितांना थक्क करून गेली. जर्मन देशातील त्यांच्या चार वर्षांच्या योगा ट्रेनर म्हणून केलेल्या वास्तव्यातील अनेक अनुभव व्यक्त केलें.
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य संग्रामात सहभागी वीरांचे स्मरण ठेऊन स्वातंत्र्य मिळवणे महत्वाचे होतेच, पण ते टिकवणे जास्त जबाबदारीचे असल्याचे भान ठेवणे आजच्या काळातही गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक डॉ. अभिजित टकले यांनी केले.
आजच्या या कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य मिळाले ते मा. श्री. राजेंद्र बांदल सर, संचालिका रेखा बांदल मॅडम, शाखेचे प्रमुख डॉ अभिजित टकले यांच्या संकल्पनेच्या सादरीकरणासाठी सर्वच शिक्षकांची मौलिक साथ मिळाली. रांगोळी, इतर सजावट, विद्यार्थ्यांची तयारी या आणि अशा कामात सर्वांचाच मोठा वाटा होता.
पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..