November 21, 2024

Samrajya Ladha

उच्चशिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना 100 टक्के शुल्काचा परतावा मिळणार, बाणेर येथील चंद्रकांत दादा यांच्या जनसंपर्क कार्यालयात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा..

बाणेर :

आज अर्थसंकल्पात महायुती सरकारने राज्यातील विद्यार्थिनींना अतिशय आनंदाची बातमी दिली आहे. अर्थसंकल्प अंतर्गत मुलींना आता मोफत शिक्षण घेता येणार असून कला- वाणिज्य- विज्ञानबरोबरच वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये उच्चशिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींचा 100 टक्के शुल्काचा परतावा राज्य सरकारमार्फत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आज भाजपा उत्तर मंडल पदाधिकाऱ्यांच्या वतीने बाणेर येथील चंद्रकांत दादा यांच्या जनसंपर्क कार्यालयात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

काही दिवसांपूर्वी राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री नामदार श्री.चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्यातील भगिनींना उच्चशिक्षण मोफत देण्याचा शब्द दिला होता. तो शब्द पूर्ण झाला केला असून आज राज्याच्या अर्थसंकल्पात शालेय महिलांना उच्च शिक्षणासाठी फी माफीचा निर्णय घेण्यात आला असून उच्चशिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींचा 100 टक्के शुल्काचा परतावा राज्य सरकारमार्फत मिळणार आहे. सुमारे 20 लाखांपेक्षा अधिक मुलींना या योजनेचा लाभ होणार असून पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपर्यंत असल्यास सदरील योजनेचा लाभ मिळेल.

यावेळी नगरसेवक अमोलभैया बालवडकर, लहू बालवडकर, नगरसेविका स्वप्नालीताई सायकर, नगरसेविका ज्योतीताई कळमकर, पुणे शहर सचिव लहूअण्णा बालवडकर , कोथरुडमतदारसंघ (उ) अध्यक्ष सचिन पाषाणकर, महिला मोर्चा अध्यक्ष अस्मिता करंदीकर, आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी नागरिकाना पेढे वाटून आनंद साजरा केला.