बालेवाडी :
बाणेर-बालेवाडी भागात राजाभाऊ गुडदे फौंडेशनच्या वतीने नियमित विविध सामाजिक उपक्रमाने आयोजन केले जाते, याचाच एक भाग म्हणून फॉउंडेशनच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त वसुंधरा अभियान यांच्या सहकार्याने तुकाई टेकडी बाणेर येथे विविध झाडांची रोपे लावून “छाया” हा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमासाठी फौंडेशनच्या अध्यक्षा किरण गुडदे, संगीत गुडदे आणि सर्व सदस्य उपस्थित होते.
दिवंसेदिवस पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास, तसेच नागरिकांमध्ये पर्यावरणविषयक जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने राजाभाऊ गुडदे फौंडेशनच्या वतीने “छाया” उपक्रम राबविण्यात आला : किरण गुडदे (अध्यक्षा राजाभाऊ गुडदे फाउंडेशन)
या उपक्रमासाठी प्रतीक जोशी, क्षितिज सणस, धनंजय गवारे, गीता ठाकूर, स्वप्नील जैन, सारंग चव्हाण, आशिष महिंद्रे, तुशील सरडे, गोपाल खडसान, विनोद भुजाडे, हरीश ताडला, रवींद्र काम्बीली, अशोक शिंदे, तारकेश्वर राव यांचे सहकार्य लाभले.
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..