September 19, 2024

Samrajya Ladha

डॉक्टर्स डे निमित्त पेरिविंकल स्कूल ने व्यक्त केली डॉक्टरांबद्दल कृतज्ञता

बावधन :

1 जुलै हा दिवस भारतात डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड जुनियर कॉलेज बावधन शाखेमधे जागतिक डॉक्टर्स डे मोठया उत्साहात साजरा झाला. डॉक्टर्स डे चे औचित्य साधून मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले. या दिवसाचे महत्व मुलांनी छान शब्दात सांगितले. डॉक्टरांच्या दवाखान्यास प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त केली.

आजीच्या बटव्यातील आणि दैनंदिन वापरातील वेगवेगळी आयुर्वेदिक औषधे म्हणून उपयोग करताना त्याचे गुणधर्म , आणि त्याचा कोणत्यावेळी उपयोग करता येईल हे मुलांनी योग्य पद्धतीने सांगितले. मुलांनी प्रथमोपचार पेट्या बनवून प्रथमोपचाराची माहिती, उपयोग सविस्तर सांगितले.

अचानक उद्भवणाऱ्या प्रसंगात कोणकोणते प्राथमिक उपचार केले पाहिजेत याविषयी मुलांनी उदाहरणासहीत माहिती दिली. आजच्या बँक जागृतता दिवसाचे औचित्य साधून विदयार्थ्यांनी बँकेस भेट दिली. बँकेचे महत्व , बँकेत चालणाऱ्या व्यवहारा विषयी माहिती मुलांना सांगितली.

शाळेच्या मुख्याध्यपिका प्रिया लढ्ढा यांनी विदयार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले. पर्यवेक्षक इंदू पाटील , कल्याणी शेळके तसेच शाळेचे सर्व शिक्षक यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.