September 17, 2024

Samrajya Ladha

बाबुरावजी घोलप महाविद्यालय व यु. इन. स्पोर्ट्स यांच्यात सामंजस्य करार..

सांगवी :

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालय व पुणे शहरातील नामांकित क्रीडा संस्था यु. इन. स्पोर्ट्स यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

या सामंजस्य कराराचे महत्त्व अधोरेखित करताना महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. संगीता जगताप यांनी सदर प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून खेळाडूंची गुणवत्ता वाढवण्यासाठी मदत करणे, विद्यार्थी व खेळाडूंसाठी खेळासंबंधी चर्चासत्र व कार्यशाळा आयोजित करणे आणि खेळा संबंधित स्पर्धा आयोजित करण्यासाठी मदत करणे ही प्राथमिक उद्दिष्टे असल्याचे मत व्यक्त केले.

यु. इन. स्पोर्ट्स ही ग्लोबल स्पोर्ट्स इकोसिस्टम असून सर्व क्रीडा प्रकारातील खेळाडू, प्रशिक्षक, चाहते, पालक, अकादमी, स्पोर्ट्स शॉप आणि विद्यापीठे या सर्वांना एकच व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम करत आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातील जागतिक स्तरावर पहिले नेटवर्किंग प्लॅटफॉर्म असल्यामुळे या कराराद्वारे विद्यार्थी, खेळाडूंना विविध स्तरावर गरजू व उत्कृष्ट खेळाडूंना मदत उपलब्ध होणार आहे.

या सामंजस्य करार प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ.संगीता जगताप, शारीरिक शिक्षण संचालिका डॉ. विद्या पाठारे व यु. इन. स्पोर्ट्स चे इंडिया बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर श्री. योगेश रवंदळे उपस्थित होते. या सामंजस्य कराराबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्रजी घाडगे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य व मानद सचिव अॅड. संदीप कदम, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव (प्रशासन) ए. एम. जाधव यांनी महाविद्यालयाचे अभिनंदन केले असून सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.