September 17, 2024

Samrajya Ladha

पुण्याच्या विविध प्रश्नांसंदर्भात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतली भेट !

पुणे :

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाची धावपट्टी वाढवण्यासाठी प्रक्रिया सुरु असून संरक्षण खात्याकडील तांत्रिक प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होण्यासंदर्भात संरक्षण मंत्री मा.श्री. राजनाथ सिंह यांच्याशी राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी चर्चा केली. विस्तारसंदर्भात अपेक्षित लागणारी जागा संरक्षण खात्याची असून याबाबतही संवाद झाला.

तसेच सदरील पुणे विमानतळावर गेल्या दीड महिन्यांपासून एअर इंडियाचे विमान पार्किंग बेवर उभे असून त्यास दुरुस्तीसाठी आणखी काही दिवसांचा कालावधी लागणार आहे. म्हणून सदरील विमान दुरुस्ती होईस्तोवर संरक्षण खात्याच्या जागेत लावण्यासाठी (पार्किंग) परवानगी द्यावी, या संदर्भातही यावेळी श्री. सिंह यांच्याशी चर्चा केली.

आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे खडकी कॅन्टोन्मेंटच्या जागेतील स्थानिकांच्या घरांचा भाडेकरार संपलेला असून नागरिकांना दिलासा देण्यासाठी पुन्हा दीर्घमुदतीचा भाडेकरार लवकरच करण्यात यावा, ही मागणीही यावेळी केली.

या सर्व मागण्यांवर मा. राजनाथ सिंह यांनी सकारात्मकता दर्शविली असून यावर लवकरच निर्णय होईल, हा विश्वास आहे.