November 21, 2024

Samrajya Ladha

पुण्यातील नद्यांच्या पूररेषांचा सर्वंकष आढावा घेऊन पूररेषा नव्याने आखण्याची गरज : मुंबई उच्च न्यायालय

पुणे :

पुण्यातील नद्यांच्या पूररेषांचा सर्वंकष आढावा घेऊन पूररेषा नव्याने आखण्याची गरज आहे असे नमूद करून मुंबई उच्च न्यायालयाने आज या संदर्भात उच्चस्तरीय समिती नेमण्याचे निर्देश दिले.

पुण्यातील नद्यांच्या पूररेषा निश्चित करताना जलसंपदा विभागाने अनेक महत्वपूर्ण गोष्टी विचारात घेतलेल्या नाहीत, त्यामुळे पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी या पूररेषा नव्याने अभ्यास करून पुन्हा आखाव्यात या मागणीसाठी सारंग यादवाडकर, विवेक वेलणकर आणि विजय कुंभार यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे, त्यावरील सुनावणीत न्यायालयाने अंतरीम आदेश देताना या विषयाच्या सर्वंकष आढावा घेऊन नव्याने पूररेषांची आखणी करण्यासाठी जलसंपदा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली २ आठवड्यात एक उच्चस्तरीय समिती स्थापन करून ४ आठवड्यात समितीने यासाठीचा रोड मॅप तयार करून उच्च न्यायालयात सादर करावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले.