बालेवाडी :
श्री खंडेराय प्रतिष्ठान शिक्षण संस्था आणि बालेवाडी विमेन क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित बालेवाडी विमेन्स क्रिकेट लीग चा चषक ‘वंडर विमेन’ संघाने पटकवीला तर उपविजेता ठरला तो बालेवाडी ‘विमेन्स क्लब’ चा संघ.
इकवी लाइफ रायजर्स संघाने तृतीय स्थान पटकविले.
सदर स्पर्धेत मालिकाविराचा सन्मान मावरीक मधुबन संघाची प्रिया दावडा, उत्कृष्ठ फलंदाज वंडर विमेन संघाची रुचिमा आर्या, उत्कृष्ठ गोलंदाज वंडर विमेन संघाची कोमल कऱ्हाळे यांना मिळाला असून उत्कृष्ठ क्षेत्र रक्षक इकवी लाइफ रायजर्स ची राधिका पाथारकार ठरली.
महिलांना मैदानी खेळ उपलब्ध करून देण्याकडे संस्था कार्यरत राहील असे संस्थेचे सचिव डॉ सागर बालवडकर यांनी सांगितले.
सदर पारितोषिक वितरण समारंभ कमानडंट पुणे विमानतळ श्री संतोषकुमार सुमन सर, किर्लोस्कर कमीन्स युनियनचे अध्यक्ष श्री महेंद्र बालवडकर, श्री कुलदीप वीज, फर्दीन खान, बालेवाडी विमन्स क्लबच्या संस्थापक अध्यक्षा सौ. रुपालीताई बालवडकर, नवचैतन्य हास्य क्लब आणि सोसायटी फेडेरेशन चे ऍडव्होकेट माशाळाकर इत्यादी उपस्थित होते. त्याच बरोबर श्री राकेश कुमार यांनी सामन्याचे उत्तम समालोचन केले.
ह्या प्रसंगी श्री खंडेराय प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष श्री गणपतराव (अप्पासाहेब) बालवडकर यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले आणि श्री खंडेराय प्रतिष्ठान च्या वतीने उत्तम समाज घडवायचा असेल तर शिक्षण क्षेत्र अतिशय तत्पर हवे आणि म्हणून अनेक नवीन उपक्रम राबविले जातील अशी खात्री दिली.
सदर स्पर्धेचे अतिशय उत्तम प्रकारे नियोजन केल्या बद्दल सि एम इंटरनॅशनल स्कुल च्या सर्व क्रीडा शिक्षकांचे कौतुक आणि अभिनंदन आलेल्या सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांनी केले.
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..