September 17, 2024

Samrajya Ladha

बावधन पेरीविंकलच्या विद्यार्थ्यांनी हिंदी राष्ट्रभाषा व ऑलंपियाड परीक्षेमध्येही रोवली विजयाची गुढी

पुणे :

१७ व १८ जानेवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या हिंदी राष्ट्रभाषा परीक्षेत पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, बावधन येथील एकूण ६८ विद्याथ्यांनी सहभाग घेतला होता. हिंदी राष्ट्रभाषा विभाग, पुणे यांनी आयोजित केलेल्या या परीक्षेमध्ये शाळेतील सृष्टी माने व रोहीत दास या दोन विद्यार्थिनींना विशेष योग्यता श्रेणी मिळाली. तसेच शाळेतील इतर विद्यार्थी प्रथम तथा द्वितीय श्रेणी मध्ये उत्तीर्ण होत विजयाची गुढी रोवली.

तसेच 18 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेली इंडियन टॅलेंट ऑलंपियाड स्पर्धेमध्ये एकूण 133 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यामध्ये गार्गी मराठे व गणेश मोरे या दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली व 18 विद्यार्थ्यांना विशेष योग्यता श्रेणी प्राप्त झाली.

अशा विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी शाळा नेहमीच प्रयत्नशील असते. या विद्यार्थ्यांना पेरिविंकल स्कूलमधून हे प्राविण्य व उज्ज्वल यश मिळवण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन व पाठिंबा विद्या झोपे ,वृषाली ब्रह्मे, मंगला पगारिया, वंदना गोखले व वैशाली बागल या शिक्षकांकडून मिळाला.

या प्रसंगी शाळेचे संस्थापक व अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल सर व संचालिका रेखा बांदल यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांना हे उत्तुंग यश संपादन करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका ऋचा हल्लूर, इंदू पाटील,कल्याणी शेळके, रश्मी पाथरकर यांचे मार्गदर्शन लाभले.