सूसगाव :
सूसगाव येथे युवा नेतृत्व पार्थदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सलग तिसऱ्या वर्षी बाणेर, बालेवाडी, सूस, महाळुंगे परिसरातील सोसायटी मधिल नागरिकांसाठी सुरू असलेली ‘BBSM सोसायटी अंतर्गत क्रिकेट लीग’ संपन्न झाली. यामध्ये पुरुष गटात झालेल्या अंतिम सामन्यात ईक्वीलाइफ हिटर् सोसायटीने BBSM क्रिकेट चषक आणि प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून 1,50,000/-₹ रक्कम पटकावली व कै. प्रदिपदादा पाडाळे चषकाचे मानकरी ठरले. तर महिला गटात वीरभद्र नगर संघाने दिमाखदार कामगिरी करत यंदाचा BBSM क्रिकेट चषक आणि प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून 1,50,000/-₹ रक्कम पटकावली.
BBSM स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वात मा. स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे व श्री राहुल बालवडकर (उपाध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,पुणे शहर) यांच्या वतीने सर्व विजयी संघांना रोख रक्कमेची पारितोषिके देण्यात आली. 119 पुरुष आणि तब्बल 40 महिला संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.
BBSM लीगमुळे विविध भागातील सोसायट्यांमधील नागरिकांशी परिचय वाढला. लीग मध्ये महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता. समीर चांदेरे (अध्यक्ष-राष्ट्रवादी युवक काँग्रेस,पुणे शहर) यांच्या प्रयत्नांतून चालु झालेल्या BBSM क्रिकेट लीगचे भव्य आणि चोख आयोजन करण्यासाठी आयोजन समिती मधील सदस्यांनी खूप मेहनत घेत स्पर्धा यशस्वी केली.
स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे-
1) विजयी संघ पुरुष – ईक्वीलाइफ हिटर्स
विजयी संघ महिला – वीरभद्र नगर
2) उपविजयी संघ पुरुष – एलिना
उपविजयी संघ महिला – रिव्हेरिया
3) तिसरा क्रमांक पुरुष – गंगा एरो टायटन्स
तिसरा क्रमांक महिला – नीलांचल
4) चौथा क्रमांक पुरुष – लाईट माँटेज
चौथा क्रमांक महिला- बालाजी व्हाईटफिल्ड
5) पाचवा क्रमांक पुरुष – कोहिनूर फॉल्कन्स
पाचवा क्रमांक महिला – राहुल अर्कस
6) सहावा क्रमांक पुरुष – रिव्हेरिया
सहावा क्रमांक महिला – याश्विन आनंद
7) सातवा क्रमांक पुरुष- बेला कासो
सातवा क्रमांक महिला – परफेक्ट १०
8)आठवा क्रमांक पुरुष – सारथी सोव्हिनियर
आठवा क्रमांक महिला- माउंट युनिक
9) नववा क्रमांक पुरुष – याश्विन
नववा क्रमांक महिला- मधुबन
10) दहावा क्रमांक पुरुष – याश्विन आनंद
दहावा क्रमांक महिला- शांति निकेतन
11) उत्कृष्ठ पुरुष फलंदाज- अमित कामत
उत्कृष्ठ महिला फलंदाज- रेष्मा कुंभार
12) उत्कृष्ट पुरुष गोलंदाज- आशिष जोगी
उत्कृष्ट महिला गोलंदाज – सुप्रिया बेंडे
13) सामनावीर पुरुष – कृष्णकांत बोरसे
सामनावीर महिला – अनुष्का भोरे
14) अंतिम सामना उत्कृष्ठ खेळाडू पुरुष – हिरे
अंतिम सामना उत्कृष्ठ खेळाडू महिला – मोनिका
15) सुदृढ पुरुष संघ – ओर्वी
सुदृढ महिला संघ – फॅवोलोसा
16) शिस्तबद्ध पुरुष संघ- कम्फर्ट झोन
शिस्तबद्ध महिला संघ- प्राईड प्लॅटिनम
17) लकी ड्रॉ (Runner Up)- लाइफ मॉंटेज
लकी ड्रॉ ( Winner) – वेदांत रेसिडेन्सी
BBSM क्रिकेट स्पर्धेतील विजयी पुरुष व महिला संघांना हॅाटेल द नेबर हुड यांस कडुन तीन दिवसीय महाबळेश्वर सहल स्पॉन्सर्ड करण्यात आली तर डायनामो फिटनेस जिम तर्फे ६ महिन्यांसाठी मोफत मेंबरशिप देण्यात आली याबद्दल हॅाटेल द नेबर हुड व डायनामो फिटनेस जिम यांचे आयोजन समिती तर्फे मनःपुर्वक आभार मानण्यात आले.
More Stories
बाणेर येथे मणिपाल हॉस्पिटलमध्ये मराठी पत्रकार संघाच्यावतीने पत्रकारांसाठी मोफत आरोग्य शिबिर..
बालेवाडी येथे आमदार मेघनाताई बोर्डीकर यांचा मराठवाडा मित्र परिवाराच्या वतीने जाहीर सत्कार संपन्न झाला..
सुसगाव येथील सुखवाणी पॅनोरमा सोसायटी मधील गणेश मंदिराच्या सभा मंडपाच्या कामाचा शुभारंभ समीर चांदेरे यांच्या हस्ते संपन्न..