बाणेर :
लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आली आहे. प्रचाराचे घमासान सुरू झाले आहे. आज कोथरूड मतदारसंघातील उत्तर कोथरूड भागातील प्रभाग क्रमांक ९ मधील पदाधिकाऱ्यांची बैठक कोथरूडचे आमदार माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली.
नेत्याची इच्छा ही आज्ञाच. त्यामुळे माननीय मोदीजींचा संकल्प पूर्ण करणे, ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. कार्यकर्त्यांनी संपर्क वाढवून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचावे, असे आवाहन कोथरुडचे आमदार माननीय चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी केले.
या वेळी सरचिटणीस पुनीत जोशी, राजेश येनपुरे, दीपक पोटे, कोथरूड उत्तर मंडळ अध्यक्ष सचिन पाषाणकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, कुलदीप सावळेकर, प्रल्हाद सायकर, गणेश कळमकर, प्रकाश तात्या बालवडकर, लहू बालवडकर, सुभाष भोळ, राहुल कोकाटे तसेच अन्य पदाधिकारीही उपस्थित होते. हर्षदा थिटे यांनी यावेळी भाजपा पक्षात प्रवेश केला.





























More Stories
तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये पेरिविंकल पौडच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी
सूस-नांदे परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचा आणि सनीज वर्ल्डचा पुढाकार
“तायक्वांदोच्या मैदानात पेरिविंकलचा दबदबा; १६ पदकांची शानदार कमाई!”