September 8, 2024

Samrajya Ladha

बाणेर, बालेवाडी, पाषाण, औंध भागात ‘पेहेल-२०२४’ अभियानमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग..

बाणेर :

पुणे महानगरपालिका, पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशन, के.पी.आई.टी, कमिन्स इंडिया फाऊंडेशन व पर्यावरण गतीविधी या संस्थांनी एकत्रितपणे संत गाडगे महाराज जयंती आणि राष्ट्रीय विज्ञान दिवस असे दुहेरी औचित्य साधून ‘पेहेल-२०२४’ हे अभियान राबवले.

 

या महाअभियानात पुणे शहरात ई-कचरा आणि प्लास्टिक कचरा संकलन २५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजे पर्यंत करण्यात आले. या अभियानामध्ये विद्यापीठ भाग मध्ये एकूण 88 संकलन केंद्र उभी केली होती त्या अगोदर 22 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी कमिन्स इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलींनी बाणेर, बालेवाडी, पाषाण, औंध या नगरामध्ये पथनाट्य करून लोकांमध्ये जनजागृती केली तसेच बाल गोकुलांच्या माध्यमातून पर्यावरण विषयावर चित्रकला स्पर्धा आणि विविध उपक्रम उपक्रम करून लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

यामध्ये व्यावसायिक विभागाने सुद्धा चांगला प्रतिसाद दिला. या अभियानामध्ये लोकांनी चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद देत जवळच्या संकलन केंद्रामध्ये त्यांच्याकडील ई-कचरा व प्लास्टिक कचरा आणून दिला.
नगरशा संकलन केंद्रे खालील प्रमाणे :
बाणेर बालेवाडी – 33
औंध – 8
पाषाण – 17
बोपोडी – 4
सुस – 5
शिवाजी नगर -7
गोखले नगर + 13
विद्यापीठ – 1
एकूण 88 संकलन केंद्रे उभी राहिली होती.

सर्वांनी एकत्र येऊन चांगले योगदान दिल्याने अभियान यशस्वी झाले.