May 10, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

योगीराज पतसंस्थेने केली किडनी प्रत्यारोपना साठी आर्थिक मदत ….

बाणेर :

अ‍ॅड. विनायक बांदेकर यांना किडनी प्रत्यारोपना साठी 25 हजार रुपयांचा आर्थिक मदतीचा धनादेश योगीराज पतसंस्थेच्या वतीने बांदेकर यांच्या मुलगा व पत्नीकडे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर, उपाध्यक्ष राजेश विधाते व शाखाध्यक्ष राजेंद्र मुरकुटे यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला.

 

याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी सांगितले की, संस्था करोडो रुपयांचा नफा मिळवत असते परंतू नफ्या मधून सभासदांना लाभांश वाटप करुन राहिलेल्या रक्क्मेचा वापर वैद्यकीय मदत, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, गरीब मुलींच्या लग्नात भांड्यांचा संसार अशा वेगवेगळ्या रुपात मदतीसाठी वापर करण्यात येतो. बांदेकर यांच्या शस्त्रक्रियेचा न झेपणारा खर्च ऐकून संस्थेने हा मदतीचा निर्णय घेतला आहे. तसेच खर्च मोठा असल्याने नागरिकांनी यथायोग्य आर्थिक मदत करण्याचे आव्हान यावेळी तापकीर यांनी केले.

याप्रसंगी संस्थेचे माजी संचालक अ‍ॅड. अशोक रानवडे, स्वामी समर्थ प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्रीकांत पाटील तसेच सभासद भीमाशंकर गायगवारे उपस्थित होते.