November 21, 2024

Samrajya Ladha

बाणेर मध्ये डॉ.नायडू सांसर्गिक रोगाचे रुग्णालय, नागरिकांना निदान व उपचार मोफत मिळणार…

बाणेर :

बाणेर – म्हाळुंगे मुख्य रस्त्यावरील, अष्टगंध सोसायटी शेजारी कोविड डेडीकेटेड हॉस्पिटलच्या इमारतीत डॉ.नायडू सांसर्गिक रोगाचे रुग्णालयाचे स्थलांतर सोमवार दिनांक १९/०२/२०२४ शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर नागरिकांच्या सेवेसाठी बाणेर येथे सुरू झाले आहे. या रुग्णालयाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करून भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर यांनी हि महत्वाची आणि आनंदाची बातमी नागरिकांसाठी सांगितली.

या रुग्णालयामध्ये रुग्णांसाठी प्रशस्त असे आंतररुग्ण विभाग (IPD), प्रयोगशाळा (Laboratory), औषधालय (Pharmacy), रेबीज लसीकरण आदी सुविधा रुग्णांसाठी सुरु आहेत. या रुग्णालयामध्ये उच्चशिक्षित व अनुभवी डॉक्टर हे रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध असतील.या रुग्णालयामध्ये सांसर्गिक रोगाचे निदान हे थुंकीद्वारे केले जाते. डॉ.नायडू सांसर्गिक रोगाचे रुग्णालय, बाणेर येथे रुग्णांसाठी अनुभवी ०६ डॉक्टर, ५० ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत, २० जणांचा नर्सिंग स्टाफ व ०२ जणांचा पॅरामेडिकल स्टाफ आहे.

बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सूस, म्हाळुंगे, औंध परिसरातील नागरिकांसाठी वैद्यकीय सोयी सुविधांनी सुसज्ज असे प्रशस्त डॉ. नायडू सांसर्गिक रोगाचे रुग्णालय सुरू झाल्याने फार मोठी वैद्यकीय सेवा प्राप्त होणार हि फार महत्वाची आणि आनंदाची बाब आहे : गणेश कळमकर (भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष)

डॉ.नायडू सांसर्गिक रोगाचे रुग्णालयात मिळणाऱ्या सुविधा
१.कुत्रा चावल्यानंतर घ्यावयाचे इंजेक्शन २४ तास मोफत चालू आहे.(केस पेपर मोफत असतील)
२.डेंग्यू, मलेरिया, जुलाब, टायफाईड, क्षयरोग, स्वाईन फ्ल्यू, कोरोना इत्यादी सांसर्गिक रोगांचे निदान व उपचार मोफत असतील.
३.रेबीज झाल्यानंतर संपूर्ण पुणे शहरात डॉ.नायडू सांसर्गिक रोगाचे रुग्णालय, बाणेर येथे रुग्णांना भरती करून घेतल्या जाते.

डॉ.नायडू सांसर्गिक रोगाचे रुग्णालय,बाणेर येथील वैद्यकीय सेवेतील अधिकारी :
• डॉ.सुधीर पाटसुते (वैद्यकीय अधीक्षक)
• डॉ.पंडित सोनकांबळे (वैद्यकीय अधिकारी)
• डॉ.दिनेश खूळपे (वैद्यकीय अधिकारी)
• डॉ.रामचंद्र पोटे (वैद्यकीय अधिकारी)
• सौ.सुनिता घोडे (हॉस्पिटल मॅट्रॉन)
• श्री.सिद्धेश्वर तापकीर (फार्मासिस्ट )