February 4, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथे छ. शिवाजी महाराज जयंती निमित्त मुलांना शिवचरित्र पुस्तक वाटप…

बाणेर :

बाणेर गावात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त अहिल्या बचत गटांनी लहान मुलांना शिवचरित्र पुस्तक देऊन जयंती साजरी करण्यात आली.

बाणेर गावातील छ. शिवाजी महाराज स्मारक येथे अहिल्या बचत गटांतील महिलांनी महाराजांना अभिवादन केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने ग्राहक रक्षक समिती पुणे शहर प्रवक्ता, अहिल्या गटाच्या अध्यक्षा साजना दिलिप भुजबळ यांनी लहान मुलांना शिवाजी महाराज इतिहास पुस्तके याचे वाटप केले.

यावेळी सावित्री गटाच्या अध्यक्ष कोमल लोणकर तसेच अहील्या गटाचे सचिव पार्वती सूर्यवंशी अनिता सूर्यवंशी इंदू कांबळे रेखा मातंग जोत्सना गटाच्या सदस्य उपस्थित होते तसं बालकलाकार पण उपस्थित होत तसेच यावेळी प्रीती सूर्यवंशी यांनी महाराजांना मुजरा करून शिवगर्जना केली.