November 21, 2024

Samrajya Ladha

बालेवाडी एसकेपी कॅम्पसमध्ये प्रजासत्ताक दिन माजी विद्यार्थी उपजिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करत उत्साहात साजरा…

बालेवाडी :

देशात प्रजासत्ताक दिन जल्लोषात साजरा होत असताना आज श्री खंडेराय प्रतिष्ठान बालेवाडीतील प्रजासत्ताक दिन संस्थेसाठी जास्त विशेष होता! कारण होतं आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे होते ते शाळेचे माजी विद्यार्थी ज्यांनी समाजाला, संस्थेला, संस्थेतील सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना खऱ्या अर्थाने उत्तम विद्यार्थी घडले आहेत याची पावती दिली.

आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री विशाल बालवडकर ज्यांनी नुकतेच एम पी ए सी परीक्षा पास केली आणि दुसरे पाहुणे म्हातोबा तुकाराम बालवडकर विद्यालयाचेच श्री रितेश भंडारी जे जग भरात फिटनेस गुरु म्हणून ओळखले जात असून सुदृढ आरोग्य उत्तम जीवन शैली कशी असावी याचे मार्गदर्शन करीत आहे. इंस्टाग्राम सुपर स्टार अशी त्यांची ख्याती असून इतरांनोक्षा काहीतरी वेगळं प्रत्येकाला करता आलं पाहिजे ह्याची शिकवण शाळेत मिळाल्याचे समाधान दोन्ही माजी विद्यार्थ्यांनी नमूद केले.

संस्थेच्या सी एम इंटरनॅशनल स्कूल, डी ए सि सि आणि मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी आणि मार्तंड भैरव अध्यापक महाविद्यालयातील शास्त्रीय नृत्य, देशभक्तीपर गीतांवर नृत्य, जिमनास्टिक, मानवी पीरामिड आणि त्याच बरोबर संचलन सादर करून सर्व पालक आणि विद्यार्थी प्रेक्षकांची मने जिंकली.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री गणपतराव बालवडकर यांनी , सर्व शिक्षकवृंदाचे कौतुक तर केलेच परंतु इतर विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थ्यांचे आदर्श घ्यायला हवेत असेही सांगितले.

शालेय जीवनात विद्यार्थी उत्तम घडला तर समाज विकसित होतो आणि समाजातील उत्तम नागरिक घडविण्यासाठी संस्थेत हर तर्हेने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि दर्जेदार विद्यार्थी घडण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांचे एकत्रित प्रयत्न यशस्वी होतील असे मत श्री खंडेराय प्रतिष्ठानचे सचिव डॉ सागर बालवडकर यांनी व्यक्त केले.

सदर कार्यक्रमांस संस्थेचे सर्व पदाधिकारी त्याच बरोबर बालेवाडी विमन क्लब च्या संस्थापिका अध्यक्षा सौ रुपालीताई सागर बालवडकर, पालक उपस्थित होते.