चिंचवड :
बाणेर येथिल माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांना महात्मा जोतीबा फुले मंडळ चिंचवड आयोजित क्रांतीजोती सावित्रीबाई फुले पुरस्कार वितरण सोहळ्यात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ‘समाज भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
माजी नगरसेविका ज्योती कळमकर यांनी कोरोना महामारी काळात दररोज सलग दोन महिने स्वतःच्या हाथाने हजारो लोकांना जेवण दिले, घरोघरी जाऊन मोफत अन्न धान्य वाटले, गोरगरीब महिलांना चादर, ब्लॅंकेट, छत्री वाटप केले, हजारो लोकांना सॅनिटायझर, डेटॉल, काढा वाटप, डेटॉल साबण मोफत पुरवले, रक्तदान शिबीर आयोजन केले तसेच आयुष्यमान आरोग्य योजना राबवून लोकांना हक्काचे पाच लाख रुपयांचे संरक्षण विमा कार्ड काढून दिले.खेळाडूंचा सत्कार करून त्यांना आर्थिक निधीची मदत केली, मंदिरामध्ये कीर्तन सप्ताह अन्नदान करत आहेत व पंढरपूर येथे वारीला जाणाऱ्या वारकरी मंडळीना अन्नप्रसाद वाटप करत सामाजिक क्षेत्रामध्ये अत्यंत प्रशंसनीय कामगिरी केली आहे. हे काम समाज व देश हित जोपासणारे आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पूर्ण आयुष्य स्त्री शिक्षणासाठी वेचले व स्त्रियांना सक्षम केले. ज्योती कळमकर यांनी देखील आपल्या उल्लेखनिय कार्याने त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवला आहे. म्हणुनच या उल्लेखनिय कार्याची दखल घेत महात्मा जोतिबा फुले मंडळाच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा मानाचा “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समाज भूषण पुरस्कार” या वर्षी ज्योती कळमकर यांना देऊन गौरविण्यात आले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या नावाने दिला जाणारा समाज भूषण पुरस्कार मिळणे हि बाब अभिमानास्पद, मनाला आनंद आणि समाधान देणारी तर आहेच शिवाय त्यामुळे अधिक जोमाने काम करण्यास प्रचंड प्रेरणा मिळते. माझे पती गणेश कळमकर यांनी खंबीर पणे माझ्या पाठीशी उभे राहत केलेले मार्गदर्शन, कुटुंब आणि कार्यकर्त्यांची साथ तसेच बाणेर, बालेवाडी, सुस, महाळूंगे, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी येथिल नागरिकांचे प्रेम यांच्यामुळेच हा पुरस्कार मिळाला : ज्योती गणेश कळमकर (माजी नगरसेविका पुणे महानगर पालिका)
सदर पुरस्कार मा. श्रीरंग आप्पा बारणे (संसदमहारत्न खासदार, मावळ) आमदार उमाताई खापरे, माजी नगरसेवक नाना लोंढे,अपर्णाताई ढोके,अश्विनीताई चिंचवडे, गणेश कळमकर, रेखाताई दर्शिले, कविता आल्हाट, सुरेश मेत्रे, सुरेश भोईर, संतोष लोंढे, चेतन भुजबळ, शेखर ओव्हाळ, मंडळाचे अध्यक्ष हनुमंत माळी (यादव)उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात आला.
More Stories
बालेवाडी येथे स्त्री फाउंडेशनकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांची सन्मान..
बालेवाडी येथे अमोल बालवडकर फाउंडेशन तर्फे हॅप्पी स्ट्रीट-2024 चे आयोजन…
श्री क्षेत्र बाणेश्वर देवस्थान बाणेर येथे महाशिवरात्र आणि वर्धापन दिन उत्साहात साजरा…