November 21, 2024

Samrajya Ladha

बालेवाडी सर्वे नं.४ मध्ये साई चौक ते मुळा नदी पर्यंत जाणारा मेट्रोने बुजविलेला नैसर्गिक ओढ्याचा प्रवाह मोरेश्वर बालवडकर यांच्या प्रयत्नामुळे मोकळा…

बालेवाडी :

बालेवाडी येथील सर्वे नंबर ४ मध्ये साई चौक ते मुळा नदी पर्यंत जाणारा नैसर्गिक ओढा मेट्रो कर्मचाऱ्यांनी बुजविलेला ओढा मोरेश्वर बालवडकर यांच्या प्रयत्नामुळे नैसर्गिक ओढ्याचा प्रवाह पुन्हा मोकळा करण्यात येत असून पावसाळ्यात सोसायट्यांना निर्माण होऊ शकलेला धोका टळला आहे.

मेट्रो कर्मचाऱ्यांनी सर्वे नंबर ४ मधून जाणारा ओढा बुजविण्याचे काम केले होते. सोसायटीमधील नागरिकांनी यांस विरोध करुण देखिल मेट्रो प्रशासन दाद देत नव्हते. त्यांनी हा नैसर्गिक ओढा बुजविण्याचे काम सुरूच ठेवले. म्हणून महापालिका आयुक्त आणि महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभाग यांच्या सहकार्याने भविष्यात निर्माण होणारा धोका टाळण्यासाठी नैसर्गिक ओढयाचा प्रवाह खुला करण्यात आला आहे : मोरेश्वर बालवडकर(उपाध्यक्ष भाजपा कोथरूड ऊ. विधानसभा/ जॉइंट सेक्रेटरी बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन)