May 15, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

योगीराज पतसंस्थेला 12 देशांच्या प्रतिनिधींची भेट……

बाणेर :

वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन पुणे आयोजित “सहकारी संस्थांचे शासन आणि व्यवस्थापन – भारतीय अनुभव” या विषयाच्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत बांगलादेश, इजिप्त, गॅम्बीया, घाना, भारत, जॉर्डन, केनिया, मॉरिशस, नामीबिया, नायजेरिया, ओमान, झांबिया या 12 देशांच्या प्रतिनिधींनी योगीराज पतसंस्थेला भेट दिली. वामनीकॉम चे जॉइन्ट प्रोग्राम डायरेक्टर डॉ. डि रवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

याप्रसंगी ज्ञानेश्वर तापकीर यांनी संस्थेची आर्थिक प्रगती कशी झाली तसेच संस्था राबवित असलेल्या सामाजिक उपक्रमाची माहिती सांगितली. संस्थेला 12 देशांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देण्याचा प्रथमच योग आला आहे. संस्था करीत असलेल्या चांगल्या कामाची दखल अंतरराष्ट्रीय पातळीवर घेत इतर देशाचे पदाधिकारी संस्थेच्या कामाचा अभ्यास करण्यासाठी आले याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे असेही यावेळी सांगितले.

बांगलादेश ग्रामीण विकास संस्थेचे संशोधन संचालक मिझानूर रेहमान यांनी यावेळी सांगितले की, योगीराज पतसंस्था ही भारत देशात उत्कृष्ट काम करत आहेच परंतू माझ्या माहिती प्रमाणे बांगलादेश मधील सहकारी संस्थांना सुद्धा प्रेरणादायी काम या संस्थेचे आहे. बांगलादेश मध्ये गेल्या नंतर मी तेथील सर्व संस्थांना योगीराज पतसंस्थेचा अभ्यास करण्याचे आव्हान करणार आहे.

याप्रसंगी अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव मुरकुटे, वामनीकॉम चे जॉइन्ट प्रोग्राम डायरेक्टर डॉ. डि रवी, रिसर्च असोसिएट स्मिता कदम, योगीराज पतसंस्थेचे उपाध्यक्ष राजेश विधाते, शाखाध्यक्ष राजेंद्र मुरकुटे, कृष्णानगर शाखाध्यक्ष शंकरराव  सायकर, सर्व संचालक व शाखा समिती सदस्य तसेच सर्व स्टाफ उपस्थित होता.

संस्थेचे तज्ञ संचालक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त रविंद्र घाटे यांनी आलेल्या सर्वांचे स्वागत केले व आलेल्या विविध देशांच्या प्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

आलेल्या सर्वांचे आभार संस्थेचे मा. संचालक अमर लोंढे यांनी मानले.