बाणेर :
बाणेर येथील कै.बाबुराव हाबाजी सायकर चौकात भाजप उत्तर कोथरूड महिला मोर्चाच्या वतीने तसेच भाजपा उत्तर कोथरूड विधानसभा मंडल पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्याकडे मिळालेल्या बेहिशोबी संपत्ती विरोधात जोरदार घोषणा देत निषेध आंदोलन करण्यात आले.
काँग्रेसचे ओडिशातील खासदार धीरज साहू यांच्या निवासस्थानी आणि इतर मालमत्तांमधून प्राप्तिकर विभागानं ३५० कोटींहून अधिक रोकड जप्त करताच सोमवारी भारतीय जनता पार्टीने राज्यभर काँग्रेस पक्षाच्या विरोधात जोरदार आंदोलन केले असून बाणेर येथे देखील भाजपा कोथरूड उत्तर विधानसभा मंडल वतीने सर्व पदाधिकाऱ्यांसह जोरदार घोषणा देत निषेध व्यक्त केला गेला.
या आंदोलनाचे नियोजन महिला मोर्चा मंडळ अध्यक्षा अस्मिता करंदीकर यांनी केले होते. तर यावेळी माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, भाजपा पुणे शहर चिटणीस लहू बालवडकर, मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, सरचिटणीस सचिन दळवी, सरचिटणीस उमा गाडगीळ, माजी नगरसेविका व महिला मोर्चा प्रभारी गायत्री खडके, महिला मोर्चा पदाधिकारी- वैशाली कमाजदार, वंदना सिंह, विजया चांदोरकर, वैदेही बापट, शहर व्यापारी आघाडी च्या रीना सोमैया अणि मंडळ पदाधिकारी मीना ताई, कल्याणी टोकेकर, निकिता माथाडे, विवेक मेथा, उत्तम जाधव अणि अन्य सर्व पदाधिकारी उपस्थितही होते.
आभार प्रदर्शन प्रभाग अध्यक्ष सुभाष भोळ यांनी केले.
More Stories
बालेवाडी येथे स्त्री फाउंडेशनकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांची सन्मान..
बालेवाडी येथे अमोल बालवडकर फाउंडेशन तर्फे हॅप्पी स्ट्रीट-2024 चे आयोजन…
श्री क्षेत्र बाणेश्वर देवस्थान बाणेर येथे महाशिवरात्र आणि वर्धापन दिन उत्साहात साजरा…