May 23, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

राज्यघटना सगळ्यांना माणूस म्हणून समृध्द करते : प्राचार्य डाॅ संजय खरात

गणेशखिंड :

गणेशखिंड येथील माॅर्डन महाविद्यालयात संविधान दिवस साजरा करण्यात आला.

 

भारतीय संविधान निर्मितीच्या ऐतिहासिक प्रक्रियेचा आढावा घेताना प्रा. किशोर मोरे यांनी भारतीय संविधानाने जात , धर्म, पंथ, भाषासह इतर अस्मिता मान्य करत सर्व समाजघटकांचे हक्क संरक्षित केले आहे असे मत मांडले.

समाजातील बहुविध अस्मितांचं रक्षण करण्यासंबंधी भारतीयांनी आपापसात केलेला करार म्हणजेच भारतीय संविधान असून तो भारतीय राष्ट्र घडणीचा पाया आहे.हि राज्यघटना जगातील सगळ्यात मोठी व कमी वेळात तयार झालेली आहे. २ वर्ष ११ महिने १८ दिवस या राज्यघटनेसाठी समिती कार्यरत होती असे प्रा. किशोर मोरे प्रास्ताविक करताना म्हणाले.

कार्यक्रमाची सुरवात उद्देशिकेला पुष्पहार अर्पण करुन झाली. त्यानंतर डाॅ संजय खरात, प्राचार्य, मार्गदर्शन करताना म्हणाले
राज्य घटनेतील सगळी कलमे अभ्यासता यावीत. राज्यघटना प्रत्येकामधे राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करते. कदाचित या राज्यघटनेने मत देण्याचा समान अधिकार राहिल पण सामाजिक आणिक आर्थिक समानता येण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आजही आपण प्रगती केली आहे पण सामाजिक प्रश्न आहे तसेच आहेत. म्हणून प्रत्येकाने उद्देशिका वाचण्यापेक्षा समजून घेऊयात. राज्यघटना सगळ्यांना माणूस म्हणून समृध्द करते असे प्राचार्य म्हणाले.

या वेळी प्राचार्य डाॅ संजय खरात, उपप्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन डाॅ किशोर मोरे यांनी तर समन्वय डाॅ संगीता ढमढेरे यांनी केले. कार्यक्रमासाठी सहकार्यवाह प्रा सुरेश तोडकर व उपकार्यवाह डाॅ प्रकाश दिक्षित यांनी मार्गदर्शन केले.