औंध :
औंध येथील रणवीर हनुमान तरुण मंडळ (वरची तालीम) यांच्या वतीने प्रथमच आगळ्या वेगळ्या पध्दतीने सामुहिक तुळशी विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता.
हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला धार्मिक दृष्टिकोनातून अतिशय पवित्र मानले जाते. दरवर्षी कार्तिक मासातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी पासून ते पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह शाळीग्रामसोबत करण्याची परंपरा आहे. हि परंपरा राखण्यासाठी औंध गावातील पहिले मानाचे मंडळ असलेल्या या मंडळाच्या वतीने हनुमान मंदिराच्या प्रांगणात सामुहिक तुळशी विवाह सोहळा संपन्न झाला.
या सोहळ्याचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष विशाल गायकवाड, विनोद बोडके, समीर खताळ, दीपक मदने, कुणाल पवार, रोहन शिंदे यांनी पुढाकार घेतला.या सोहळ्यास स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.


More Stories
गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयात मानसशास्ञाचा ‘कॅलिडोस्कोप १६’ अंकाचे प्रकाशन
औंध येथील अमोल दत्तात्रय टेंबरे यांना भारत भूषण पुरस्कार प्रदान…
ग्राफिटीच्या हौशी कलाकारांचे चित्र प्रदर्शन संपन्न…