May 26, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

३५० व्या श्रीशिवराज्यभिषेका दिनानिमित्त लेह(खारदूंगला पास)ते कन्याकुमारी सायकल मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या युवकांचा बाणेर येथे सन्मान…

बाणेर :

३५० व्या श्रीशिवराजाभिषेका निमित्त लेह(खारदूंगला पास)ते कन्याकुमारी सायकल मोहीम २०२३ यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल बाणेर येथील श्रीबाणेश्वर मंदिराच्या सभागृहात सर्व सायकलस्वार यामध्ये विनायक दारवटकर, किरण शेळके, हनुमंत जांभुळकर, विशाल डुंबरे, संदीप गोडांबे, दत्तात्रय म्हाळसकर, प्रकाश खाणेकर, राकेशभाऊ धावडे, तसेच मोहिमेला ज्ञात-अज्ञात व्यक्तींनी सहकार्य केले अशांचा सन्मान व कौतुक सोहळा “माणसं जीवाभावाची”-“शिवभक्त” मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आला.

 

सदर कार्यक्रमास ज्येष्ठ इतिहास तज्ञ पांडुरंगजी बलकवडे, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदूस्थान चे संस्थापक नितीन चौगुले, मुळशी तालुक्यातील घोटावडे गावचे मा.सरपंच रमेश शेळके, पुण्यातील हिंदुत्ववादी नेतृत्व दिपक नागपुरे, शिवव्याख्याते निलेश भिसे, युवा सामाजिक कार्यकर्ते कु.जयेश संजय मुरकुटे, युवा शिवव्याख्याते सौरभ करडे, मा.नगरसेवक सनी निम्हण, भाजपाचे गणेश कळमकर, लहू बालवडकर, प्रकाशतात्या बालवडकर, प्रल्हाद सायकर, सचिन पाषाणकर, रा. स्व.संघाचे राजेंद्र सुतार, राहुल कोकाटे, राष्ट्रपती पदक विजेते मधुकर रणपिसे, कोंढवे धावडे गावचे मा.सरपंच अतुल धावडे, मा.उपसरपंच सुनित लिंबोरे, मुकुंद मासाळ, आप्पा भूमकर, पत्रकार केदार कदम व इतर अनेक क्षेत्रातील मान्यवर तसेच सन्मानार्थी शिलेदारांचे कुटुंबीय शिवभक्तांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.

सर्व शिलेदारांचा सन्मान करताना प्रत्येकाने संपुर्ण मोहिमेमध्ये सायकल चालवताना प्रवासामध्ये आलेले रोमहर्षक अनुभव उपस्थितांना सांगितले.

सदर सन्मान सोहळ्याचे सूत्रसंचालन विश्वास कळमकर यांनी केले तर ‘माणसं जीवाभावाची-शिवभक्त मित्र परिवाराच्या’ वतीने राजेंद्र बेंद्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले.