November 21, 2024

Samrajya Ladha

बालेवाडी येथील सन होराईझन सोसायटी,सदाफुली सोसायटी परिसरातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी टाकी पासुन नविन पाईप लाईन टाकली जाणार..

बालेवाडी :

बालेवाडी येथील सन होराईझन सोसायटी,सदाफुली सोसायटी परिसरातील भागात गेली अनेक दिवस गंभीर पाणीप्रश्न निर्माण झाला आहे. तो सोडविण्यासाठी कोथरुड विधानसभा आमदार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लेखी सूचना करत पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना पाणी प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यासाठीच आवश्यक उपाययोजना करण्यासाठी या भागाची पाहणी माजी नगरसेवक अमोल बालवडकर, भाजपा नेते गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर यांनी पुणे महानगपालिकेच्या कनिष्ठ अभियंता योगिता भांबरे मॅडम व परिसरातील नागरिकांना बरोबर घेऊन केली.

बाणेर बालेवाडी परिसरात पाणी प्रश्न गेले अनेक दिवस गंभीर होत आहे. अनेक उपाय करूनही पाणी प्रश्न सुटला नाही म्हणून त्यावर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी 24×7 पाण्याच्या टाकी पासून नवीन लाईन जोडणे आवश्यक होते हि लाईन त्वरित टाकून पूर्ण करावी अशी लेखी सूचना मा मंत्री मोह्दय कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. यावर पाणी पुरवठा विभागाचे मुख्यकार्यकारी अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी हे काम HDEP शंभर फुट लांबीची नवीन पाईप लाईन टाकून ह्या भागाचा पाणी प्रश्न सुटण्यासाठी उपाययोजना सुचवली आहे. या कामाची सुरुवात दि 28 ऑक्टोबर रोजी सुरु होऊन पुढील पाच दिवसांत पूर्ण होणार आहे.

तसेच बाणेर गावठाण, सोमेश्वरवाडी, कन्फर्ड झोन सोसायटी, प्रथमेश पार्क,औंध बाणेर डी पी रोड, पूना पिपलं बँक परिसर, रेगुलस सोसायटी, पॅनकार्ड क्लब रोड या भागातील पाणीप्रश्न बाबत पाठपुरावा माजी नगरसेवक अमोल बालवडकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर यांनी केला होता. याची पाहाणी करत पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरु असून लवकरच पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.