November 21, 2024

Samrajya Ladha

मॉडर्न कॉलेज वारजे वतीने जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा..

वारजे :

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, वारजे, पुणे -५८ येथे जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला.

त्या निमित्ताने दोन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मॉडर्न प्राथमिक व माध्यमिक शाळा, वारजे येथील मुलांशी त्यांच्या वर्गात जाऊन मानसिक आरोग्य विषयी जन जागृती पर संवाद साधला. त्याला शाळेतील विद्यार्थ्यांकडून उत्स्पुर्त प्रतिसाद मिळाला.

तसेच, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून मानसिक आरोग्य जनजागृती विषयक प्रभातफेरी सुद्धा काढण्यात आली होती. त्यात, मुलांनी वेगवेगळया फलकांदवारे मानसिक आरोग्य विषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.

या कार्यक्रमाचे समन्वय कला शाखेच्या प्रा. स्वराली सूर्यवंशी, प्रा. स्वाती पाटील तसेच वाणिज्य शाखेच्या प्रा. प्रिया सामक, प्रा. वृषाली भुर्के, प्रा. मुग्धा खंडकर, प्रा. वैशाली कुलकर्णी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष मा.डाॅ. गजानन एकबोटे, सचिव प्रा.शामकांत देशमुख, सहकार्यवाह डाॅ. ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवाह डाॅ. निवेदिता एकबोटे, व्हीजिटर प्रा.पल्लवी जाधव आणि प्राचार्या डाॅ. वर्षा बापट यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.