November 22, 2024

Samrajya Ladha

मनसे च्या मागणीला यश संगमवाडी स्मशानभूमी चे काम लवकर सुरु होणार…

पुणे :

पुणे महानगरपालिकेपासून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या संगमवाडी गावात स्मशानभूमी चे काम अपूर्ण अवस्थेत असून त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. याची दखल घेत मनसेच्या वतीने मनपा आयुक्त यांची सतत पाठपुरावा करण्यात आला. या मागणीला यश आले स्मशानभूमीच्या कामासाठी महानगरपालिकेने निधी उपलब्ध केला असून लवकरच काम सुरू होणार आहे. मनसेने केलेल्या पाठपुराव्यामुळे नागरिकांची समस्या सुटण्यात मदत होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

संगमवाडी गावातील स्मशानभूमीची काम निधी अभावी गेले १० ते १२ वर्ष झाले अपूर्ण अवस्थेत आहे. हे गाव मनपा हद्दीत आहे कि ग्रामपंचायत हद्दीत हेच समजत नव्हते. पुणे मनपापासून अगदीच २ किलोमीटर वरील गावात हि अवस्था आहे. उन्हापावसात महिला, जेष्ठ नागरिक त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाळ्यात एक महिला बेशुध्द होऊन पडली होती. मनसेने ३ वर्षांपूर्वी पण एकदा आंदोलन केले होते व हे रखडलेले काम पूर्ण होण्यासाठी मनसेच्या वतीने पुणे मनपाच्या आयुक्तांशी सतत पत्रव्यवहार करत अखेर जुन २०२३ ला मनपा प्रशासनाने निधी मंजूर केला व लवकरच काम चालू होईल त्यामुळे नागरिक आम्हाला भेटून धन्यवाद व आभार मानत आहे असे मनसे पुणे शहर वतीने सांगण्यात आले.

पाठपुराव्यासाठी मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, महाराष्ट्र सरचिटणीस रणजितदादा शिरोळे, पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण, विभागाध्यक्ष विनायक कोतकर, उपविभागाध्यक्ष गोकुळ अडागळे, स्थानिक शाखाध्यक्ष मिलन भोरडे, मुकेश खांडरे, गोकुळ पवार, अभिजीत ताठे, तेजस मोहिते, प्रयाग भोरडे, कुशल खांडरे, अभि परदेशी, हरदीप पवार, अंकुश हांडे, रोहित चपटेकर महाराष्ट्र सैनिकांनी मोठी मेहनत घेतली.