September 17, 2024

Samrajya Ladha

इंडियन सोसायटी ऑफ ऍनालीटीकल सायंटिस्टसचा (आयएसएएस) वर्धापन दिन मॉडर्न कॉलेज, गणेशखिंड येथे उत्साहात साजरा…

गणेशखिंड :

गणेशखिंड येथील मॉडर्न कॉलेज येथे इंडियन सोसायटी ऑफ ऍनालीटीकल सायंटिस्टसच्या वर्धापन दिनानिमित्त सोसायटीने प्रोफेसर एच. जे. अर्णीकर ट्रस्ट व रसायन शास्ज्ञ विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक एकदिवसीय “लाभ टू लाईफ विज्ञानाचा समाजावर परिणाम’’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. चर्चासत्राचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डाॅ डी पी अंमळनेरकर (प्रोफेसर एमेरीटस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व माजी संचालक सीमेट यांच्या हस्ते झाले.

उद्घाटनीय भाषणात डाॅ अमळनेरकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाबद्दल रुची निर्माण करण्यासाठी विविध शास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधा बद्दल माहिती दिली असे सांगितले.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयएसएस, पुणे चॅप्टर च्या अध्यक्षा डॉ ‌ निलिमा राजुरकर यांनी आयएसएएस तर्फे सुरू असलेल्या अनेक उपक्रमांची माहिती दिली . प्राचार्य डॉ.संजय खरात यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

यावेळेस प्रा एस एम पाटील (माझी कुलगुरू एन एम यू, बीव्हीडीयू), डॉ . अविनाश कुंभार (रसायनशास्त्र विभाग प्रमुख, साफुपुवि), डॉ.संजय खरात (प्राचार्य) डॉ.माधुरी कुलकर्णी (रसायनशास्त्र विभाग प्रमुख, मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड) व्यासपीठावर उपस्थित होते.

वर्धापन दिनानिमित्त वर्षभरात शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या आजीव सदस्यांचे सत्कार करण्यात आले. डॉ.अंमळनेरकर यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर चर्चासत्रामध्ये डॉ. विनय भंडारी- सी एस आय आर एन सी एल, डॉ .सौरब दुबे- आयसर, डॉ.प्रसाद कुलकर्णी- ए आर आय, डॉ. हबीब पठाण- भौतिकशास्र विभाग साफुपूवि, डॉ .शैलेश कंटक- प्रयाग हॉस्पिटल यांची व्याख्याने झाली. प्रयोग शाळेत केलेल्या संशोधनाचा समाजासाठी कसा उपयोग होतो हे या व्याख्यानांमधून नमूद करण्यात आले.

डॉक्टर मनिषा बोरा यांनी नॅनोसिन्थेसिस या विषयावर लिहिलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन या कार्यक्रमात करण्यात आले. डॉ. अनुपा कुंभार यांनी आभार प्रदर्शन केले व डॉ.मोहिनी गुप्ते यांनी सूत्रसंचालन केले.

ऍडव्हान्स स्पेक्ट्रोस्कोपी विषयावर आधारित
वर्धापन दिनानिमित्त संस्थेने घेतलेल्या ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
१. शैलेश कुमार (व्ही आय आय टी , नागपूर )
२. साहिल मेंघांनी (महाराजा सयाजीराव विदयापीठ वडोदरा)
३.अनुश्री राजू (डी जी वैष्णव महाविद्यालय चेन्नई )
उत्तेजनार्थ : पूजा पाटील (रसायनशास्र विभाग साफुपूवि)
ई – पोस्टर स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
१. रिचा सारस्वत (मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड),
२. प्रियांशी राठोड (के पी जी यू वडोदरा), ३. सर्वेश नवघरे (रसायनशास्र विभाग साफुपूवि), उत्तेजनार्थ : स्नेहल रायते (के के डब्लु कॉलेज पिंपळगाव) आणि नीतू शुक्ल (डी आर बी सिंधू महाविद्यालय नागपूर) यांना बक्षिसे देण्यात आली.