March 21, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

विद्यार्थीच्या मागण्यापूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करणार : सुदर्शन जगदाळे(पुणे शहर अध्यक्ष आप)

पुणे :

दि.06/10/2023 रोजी अनुसूचित जाती प्रवर्गातील 2022 च्या सर्व संशोधक विद्यार्थिना बार्टी मार्फत देण्यात येणारी संशोधन अधिछत्रवृती (फेलोशिप) रजिस्ट्रेशन दिनांक पासून सर्व पात्र विद्यार्थीना मिळावे, या मागणीसाठी मा.महासंचालक वारे साहेब बार्टी यांना आम आदमी पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

महासंचालक यांनी सदरील निवेदनाची तत्काळ दखल घेत फेलोशीप यादी जी गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून प्रलंबित आहे ती यादी दोन दिवसात प्रसिद्ध करू असे आश्वासन दिले व चीफ सेक्रेटरी यांच्याशी पत्रव्यवहार करून उर्वरित मागण्या पूर्तता करण्याचं आश्वासन महासंचालक यांनी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना दिले.

तसेच विद्यार्थीच्या मागण्यापूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पुणे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी दिला.

आंदोलक विद्यार्थी यांनी सर्व पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केले.

यावेळी अध्यक्ष सुदर्शन जगदाळे, अक्षय शिंदे सुरेखा भोसले ,प्रशांत कांबळे, निरंजन अडागळे, शिवाजी डोलारे ,अमोल मोरे, निलेश वांजळे, चांगदेव नेटके, आकाश मुनियान ,विजय साठे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.