November 22, 2024

Samrajya Ladha

औंध गावातील कचरा समस्या सोडविण्याकरिता औंध गाव विश्वस्त मंडळाने सहाय्यक आयुक्तांना दिले निवेदन…

औंध :

औंध गावात दिवसेंदिवस कचरा समस्या वाढत असून हि समस्या सोडविण्यासाठी कचरा गोळा करणेसाठी दोन घंटा गाडी मिळणेबाबत आज मंगळवार दि. ०३.१०.२०२३ रोजी औंध क्षेत्रिय कार्यालय मा. सहायक आयुक्त यांना औंधगाव विश्वस्त मंडळ वतीने निवेदन देण्यात आले.

क्षेत्रीय कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या औंध गावामध्ये कचरा उचलण्याच्या सुविधा नसल्याने कचरा पडून राहतो आणि त्यामूळे दुर्गंधी पसरून परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. कचरा ही समस्या उग्र रूप धारण करत असली तरी महापालिका प्रशासन याच्याकडे कामगिरीने लक्ष देत नाही. वारंवार तक्रारी करून देखील ओला आणि सुका कचरा उचलण्यासाठी दोन घंटा गाड्या उपलब्ध करून दिल्या गेल्या नाहीत. त्यामुळे कार्यालयातील सहाय्यक आयुक्त दापकेकर यांना औंध गाव विश्वस्त मंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

यावेळी औंधगाव विश्वस्त मंडळ अध्यक्ष राहुल प्रकाश गायकवाड, सेक्रेटरी गिरीश जुनवणे, मा. अध्यक्ष योगेश जुनवणे व सल्लागार आनंद जुनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.