पुणे :
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘ मनोगीते’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘स्वरमंगला’ प्रस्तुत हा कार्यक्रम रविवार, ८ ऑकटोबर २०२३ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे होणार आहे.
गीतकार,संगीतकार कै.मनोहर केतकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.कार्यक्रमाची निर्मिती मंगला चितळे यांची आहे. ज्योती करंदीकर, वर्षा भिडे, मंजिरी जोशी, अर्चना भागवत, संगीता जोशी, प्रीती गोरे, माधवी पोतदार, पराग पांडव, अदिती गराडे, उध्दव कुंभार, चारुशीला गोसावी, जयश्री कुबेर सहभागी होणार आहेत.
हा कार्यक्रम विनामूल्य आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १८३ वा कार्यक्रम आहे.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.
More Stories
गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयात मानसशास्ञाचा ‘कॅलिडोस्कोप १६’ अंकाचे प्रकाशन
औंध येथील अमोल दत्तात्रय टेंबरे यांना भारत भूषण पुरस्कार प्रदान…
ग्राफिटीच्या हौशी कलाकारांचे चित्र प्रदर्शन संपन्न…