औंध :
‘स्वच्छता हीच सेवा’ या अभियानांतर्गत आज पुणे महानगरपालिके मार्फत ‘एक तास स्वच्छतेसाठी’ ही मोहीम संपूर्ण शहरात राबवण्यात आली. औंध -बोपोडी परिसरात मा.नगरसेवक प्रकाश ढोरे व भाजपचे मा.शहर चिटणीस सुनील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत व सक्रीय सहभागातून ही मोहीम राबवण्यात आली.
या स्वच्छता मोहिमेत औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक योगेश जाधव, ज्योती जाधव, वेतन विभागाच्या शुभांगी भैसाने, राणी स्वामी, मुकादम चंद्रकांत साठे, पुणे महापालिकेचे स्वच्छता सेवक यांच्यासह नितीन गायकवाड, शाम भालेराव, जितेंद्र गायकवाड, हिमांशू मुथय्या, अनिल माने यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
यावेळी सुनील माने म्हणाले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासह अनेक महापुरुषांनी आपल्याला स्वच्छतेचे महत्व पटवून दिले आहे. आरोग्य आणि परिसराची स्वच्छता यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. उत्तम आरोग्यासाठी स्वच्छता आवश्यक असते, स्वच्छतेमुळे आपल्याला समृद्धी येते. म्हणूनच आपल्या घरासोबत परिसर ही स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना स्वच्छतेची सवय लागणे गरजेचे असते. आरोग्य सेवक परिसराची सफाई करण्यासाठी नेहमी कार्यरत असतात त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही या स्वच्छता मोहीमेत सहभागी झालो.
प्रकाश ढोरे म्हणाले, महात्मा गांधीजींना स्वच्छांजली देण्यासाठी ‘स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा’ ही मोहीम राबवण्यात आली. गांधीजीच्या जयंतीच्या आदल्या दिवशी स्वच्छतेसाठी ‘एक तारीख, एक तास’ देऊन गांधीजींना अभिवादन करण्यासाठी मोदीजींनी ही अनोखी योजना आणली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले होते. परिसर स्वच्छ्तेची जबादारी म्हणूनच आम्ही आज प्रशासनाच्या वतीने राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहीमेत सहभागी झालो.
More Stories
गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयात मानसशास्ञाचा ‘कॅलिडोस्कोप १६’ अंकाचे प्रकाशन
औंध येथील अमोल दत्तात्रय टेंबरे यांना भारत भूषण पुरस्कार प्रदान…
ग्राफिटीच्या हौशी कलाकारांचे चित्र प्रदर्शन संपन्न…