November 22, 2024

Samrajya Ladha

औंध, बाणेर, बालेवाडी परिसरातील अंगणवाड्यांना सुखाई प्रतिष्ठानच्या माध्यमातुन अविनाश कांबळे यांची मदत….

औंध :

सुखाई प्रतिष्ठानच्या वतीने औंध गाव कस्तुरबा वसाहत, इंदिरा वसाहत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर औंध, बाणेर बालेवाडी येथील अंगणवाडीतील 125 विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व बसण्यासाठी चटई देण्यात आल्या. औंध बाणेर बालेवाडी महाळुंगे पाषाण येथील सोळा १६ अंगणवाड्यांमधील सुदृढ बालक स्पर्धेतील विजेत्यांना अविनाश कांबळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

परिसरातील गोर गरीब मुले अंगणवाडीत शिकत असतात. अंगणवाडीला अपुऱ्या सुविधा असतात. बसण्यास काहीतरी असावे व गणवेश मिळाल्याने अंगणवाडीत येण्याची आवड निर्माण व्हावी म्हणून सामाजिक बांधिलकी जपत अंगणवाडीतील 125 विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व बसण्यासाठी चटई देण्यात आली. तळागाळातील गरजूंना मदत करण्याचं काम सुखाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेहमीचं आम्ही करत असतो : अविनाश कांबळे (अध्यक्ष सूखाई प्रतिष्ठान)

सूखाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश कांबळे नेहमीच मदतीचा हात पुढे करतात. त्यांची शिक्षणाप्रती असलेली आवड आणि तळमळ सगळ्यांना प्रेरणा देणारी आहे. अशा सेवाभावी वृत्तीच्या व्यक्तिमत्वाला आमचा मानाचा मुजरा : औंध परिसरातील अंगणवाडी सेविका आणि पालक

यावेळी सुखाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अविनाश कांबळे मुख्याध्यापिका प्रतिभा मुंडे, अंगणवाडी कार्यकर्त्या निवेदिता वाघमारे, शोभा कांबळे, आरती जगताप, स्मिता कांबळे, वनमाला कांबळे, सुनीता वाल्हेकर, स्वाती गराडे, एलिझाबेथ पंडित, अश्विनी पेंढारकर, संजीवनी मोकाशी आदी उपस्थित होते.