February 4, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडी येथील विनापरवाना रस्ता खोदाई प्रकरणी बांधकाम व्यावसायिकास पाठीशी घालणाऱ्या पथ विभागाच्या अभियंत्यास निलंबित करा : रयत स्वाभिमानी संघटना

पुणे :                 

बालेवाडी येथील सर्वे नं 45 या ठिकाणी बांधकाम व्यावसायिक यांनी कस्तुरी स्पेसेस या बांधकाम प्रकल्पासाठी विद्युत केबल टाकण्यासाठी विनापरवाना रस्ते खोदाई केली. ही रस्ते खोदाई 27/01/2023 रोजी केली ती खोदाई 560 मी. केली परंतु पुणे मनपाच्या अभियंता विजय कुलकर्णी यांचे सांगणे नुसार कस्तुरी स्पेसेसच्या बांधकाम व्यावसायिक यांस खुलासा नोटीस पाठवली तेव्हा फक्त 105 मी. चा उल्लेख केला. पुणे मनपाच्या मार्फत विकसित केलेल्या रस्त्यांची खोदाई करून विदयुत केबल टाकणेची बाब गंभीर स्वरूपाची आहे याचेच भान मुख्य अभियंता पथ विभागाचे विजय कुलकर्णी यांना राहिलेले दिसत नाहीत.              

एक महिना झाला असेल रस्ते खोदाई करून परंतु विजय कुलकर्णी यांना आम्ही ऑनलाईन तक्रार देऊन वेळोवेळी फोनद्वारे कळवून तरीसुद्धा विजय कुलकर्णी यांचेकडून गांभियाने घेतले जात नाही. विजय कुलकर्णी यांचेकडून बांधकाम व्यावसायिक यांना दंड आणि गुन्हा दाखल होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमचा प्रथम दर्शनी असा अंदाज आहे की विजय कुलकर्णी आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यामध्ये आर्थिक हितसंबंध जोपासले गेले आहेत का याचा तपास करावा, अशी आमची आपणास विनंती आहे.

*आमच्या मागण्या* :- 

1) पथ विभाग मुख्य अभियंता विजय कुलकर्णी यांना निलंबीत करावे.

2)सर्वे नं 45 बालेवाडी येथे त्रिसदस्यीय समिती नेमुन केलेल्या रस्ते खोदाईची मोजणी करावी. 3] मोजणी केल्यानंतर त्या बांधकाम व्यावसायिक यांना तीनपट दंड आकारून गुन्हा दाखल करण्यात यावा. 

4] ज्या ठेकेदाराने विनापरवाना खोदाई केली त्यांचे लायसन रद्द करण्यात यावे.

सदर मागण्यांचा सकारात्मक विचार न झाल्यास आम्ही येत्या काही दिवसात पुणे मनपा समोर उग्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा रयत स्वाभिमानी संघटनेचे सरचिटणीस रविराज काळे यांनी दिला.