भारतीय विद्या भवन, इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन
पुणे :
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘ना.धों. महानोर :नृत्य आणि काव्याचा संगम’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनीवार ,१६ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम होणार आहे.
महानोर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या कविता नृत्यप्रकारातून सादरीकरणाचा हा कार्यक्रम तेजदीप्ती डान्स स्कुल तर्फे प्रस्तुत केला जाणार तेजदिप्ती पावडे, राधिका पारकर, रिद्धी तळेकर, अपूर्वा बिराजदार, श्रमिका गायकर, अभिषेक धावडे, अनुभव मिश्रा हे कलाकार सहभागी होणार आहेत. तेजदीप्ती पावडे यांचेच दिग्दर्शन आहे.
भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. हा कार्यक्रम विनामूल्य आहे. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १८१ वा कार्यक्रम आहे .
More Stories
गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयात मानसशास्ञाचा ‘कॅलिडोस्कोप १६’ अंकाचे प्रकाशन
औंध येथील अमोल दत्तात्रय टेंबरे यांना भारत भूषण पुरस्कार प्रदान…
ग्राफिटीच्या हौशी कलाकारांचे चित्र प्रदर्शन संपन्न…