June 7, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

औंध गावातील श्री गणेश विसर्जन घाटाची पाहणी करत नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाला आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिल्या सूचना..

औंधगाव :

गणेश उत्सव लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी स्थानिक नेत्यांसह औंधगाव येथील मुळा नदीवरील श्री गणेश विसर्जन घाटाची पाहणी केली आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुचना केल्या.

 

औंध गाव परिसरातील नागरिकांची गणेश विसर्जन वेळी कोणतीही गैरसोय होऊ नये याची प्रशासनाने संपूर्ण काळजी घ्यावी, अशा सूचना सबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडून त्वरित आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करुन विसर्जन वेळी सुव्यवस्था राखण्याची खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत : आमदार सिद्धार्थ शिरोळे 

यावेळी यावेळी मा. वसंत त्यात्या जुनावणे, मा. बाळासाहेब रानवडे, मा. सचिन वाडेकर, मा. आनंद छाजेड, मा. सुप्रीम चोंधे, मा. सचिन मानवतकर, मा. सौरभ कुंडलिक, मा. सागर मदने, मा. नितीन बहिरट उपस्थित होते.