November 22, 2024

Samrajya Ladha

शिक्षकांचे सर्व विषय मार्गी लावण्याची पालक मंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

शिवाजीनगर :

भारतीय जनता पार्टी व पुणे विकास प्रतिष्ठान व प्रोग्रेसिव्ह एडुकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 9 सप्टेंबर ला शिक्षक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून मा श्री चंद्रकांतदादा पाटील, पुणे जिल्हा पालक मंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उपस्थित होते.

या प्रसंगी ते म्हणाले, “ऋतुजा,नम्रता,वागणूक ही शिक्षकांच्या वागण्यातून मिळते. ते समाजाचा आधारस्तंभ आहेत. शिक्षकांचे सगळे विषय मार्गी लावू. सगळे प्रश्न मार्गी लावू.”

मा आ जगदीशजीं मुळीक यांनी या कार्यक्रमा मागचा हेतू सांगितलं ते म्हणाले, ” देश घडविणारे व्यक्तिमत्व शिक्षक तयार करतात. शिक्षकांना मान देणे ही आपली संस्कृती आहे. देशातील सगळ्यात मोठे शिक्षणाचे केंद्र हे पुणे आहे. आज येथे शिक्षकांचा सन्मान होत आहे हे फार आनंदाचे आहे.”

मा गणेश घोष, बीजेपी, सरचिटणीस म्हणाले कुटुंब घडविण्यासाठी चांगल्या शिक्षकांची गरज आहे

आ माधुरीताई मिसाळ माजी विध्यार्थी मॉडर्न महाविद्यालय म्हणाल्या स्वतःला विसरून शिकवणारे शिक्षकां विषयीचा आदर कमी झालेला दिसतो. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे.

डॉ गजानन एकबोटे यांना तहहयात प्रोफेसर (प्रोफेसर ऑफ सर्जरी) अशी सामान्मनीय मान्यता मिळाली म्हणून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

डॉ गजानन एकबोटे, कार्याध्यक्ष, पी ई सोसायटी म्हणाले “शिक्षकांचे महत्व वाढले पाहिजे. चांगला शिक्षक नेहमी लक्षात राहतात. एक चांगल्या समाजासाठी चांगला शिक्षक आवश्यक आहे.”

यावेळी डीसिपी संदीपसिंह गिल, जॉईंट डायरेक्ट ऑफ हायर एडुकेशन डॉ किरण कुमार बोन्दर, डॉ अरविंद पांडे, डॉ विनय कुमार यांच्यासह काही विशेष सन्मान करण्यात आले.ते शिक्षक मान्यवार पुढीलप्रमाणे :

डॉ संदीपसिंग गिल,

डॉ गजानन एकबोटे,

डॉ अरविंद पांडे,

प्रा सुरेश तोडकर

डॉ शिल्पा मुजुमदार,

डॉ शुभांगी पुराणिक,

डॉ विनय कुमार,

डॉ शलाका चाटेकर

डॉ शीतल बोर्डे,

सौं स्मिता कारंदीकर,

सौं हर्षदा पिसाळ -निगडे,

श्री भास्कर रेवाडकर,

श्री दादाभाऊ शिनालकर,

श्री गणपत नांगरेकर

श्री महेश सुपेकर

श्री दिनेश कुलकर्णी

सौ सुनीता विदवत

श्री नितीन वाणी

श्री विकास काटे

श्री बाळकृष्ण चोरमुळे

सौ अनुप्रिती गाजरे

श्री प्रमित लोकरे

आज वेगवेगळ्या संस्थातील 745 शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

प्रमुख अतिथीचे स्वागत व प्रास्ताविक मा जगदीश मुळीक,माजी भाजपा अध्यक्ष (पुणे शहर ) यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ निवेदिता एकबोटे, प्रदेश उपाध्यक्ष – भाजप युवा मोर्चा व उपकार्यवाह प्रोग्रेसिव्ह एडुकेशन सोसायटी यांनी केले. आभार प्रदर्शन श्री योगेश मुळीक यांनी केले.

यावेळी मा गणेश घोष, ॲड. एस के जैन, भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, संदीप खर्डेकर, दीपक पोटे, राजेश येनपुरे, बापू पठारे, वर्षा ढमाले, व शेखर्जी मुंदडा असे बीजेपी चे पदाधिकारी उपस्थित होते.

या प्रसंगी डॉ ज्योस्त्ना एकबोटे, सहकार्यवाह, पी ई सोसायटी व प्रा शामकांत देशमुख सेक्रेटरी पी ई सोसायटी यानी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला संस्थेतील सर्व संस्थाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. नियामक मंडळाचे सर्व सदस्य व संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.