June 5, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड येथे AFST चा वर्धापन दिन व शिक्षक दिन साजरा…

गणेशखिंड :

गणेशखिंड येथील मॉडर्न कॉलेज येथे अससोसिएशन ऑफ फूड सायंटिस्ट टेकनॉलॉजि ऑफ इंडिया पुणे चॅप्टर यांच्या सहयोगाने AFST चा वर्धापन दिन (foundation day) व शिक्षक दिन साजरा केला. या दिवशी ‘फूड & ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. याचे उदघाटन श्री सुरेश अन्नापुरे, जॉईंट कंमिशनर, FDA व श्री गोविंद चितळे, डायरेक्ट, चितळे बंधू मिठाईवाले, यांच्या हस्ते झाले.

प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय खरात म्हणाले, ”  फूड इंडस्ट्री मध्ये चितळे बंधू हे जागतिक स्तरावर पोहोचलेले नाव आहे.विध्यार्थपुढे चितळे बंधू सारखे आदर्श व्यावसायिक येणे हा सुवर्णयोग आहे.”

श्री गोविंद चितळे यांनी विध्यार्थ्यांना चितळे उद्योगामध्ये प्रॅक्टिकल अनुभवासाठी येण्याचे आवाहन केले. डॉ सुरेश अन्नापुरे म्हणाले ‘अनुभवी व्यक्तीचे प्रोत्साहनपर एक वाक्य तुमचे आयुष्य बदलू शकते. उद्योजक होण्यासाठी व तो प्रवास अनुभवण्यासाठी असे कार्यक्रम व्हावेत. “

जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त आयोजित स्पर्धेच्या पारितोषिक वितरीत करण्यात आले.

 1. प्रेरणा होळकर 2. तनुजा आकर्षे 3. विनय काकरंबे

 पोस्टर स्पर्धा बक्षीस

1. अपर्णा मोरे 2. आरती तळेकर 3. ओम अडसुल

डॉ सतीश बोरकडे यांनी या क्षेत्रातील संधी व श्री आमरेंद्र महामुनी, डायरेक्टर, समर्थ टेकनॉलॉजि यांनी फूड लेबलिंग रूल्स अँड रेगुलशन्स या विषयावर मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेला MIT कॉलेज, वाघीरे कॉलेज, टी सी कॉलेज, सिमबियॉसिस कॉलेज व मॉडर्न कॉलेज चे 122 विध्यार्थी होते.

पाहुण्यांचे स्वागत डॉ. अंजली भोईटे, प्रेसिडेंट, AFST यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. वाझीद खान, सेक्रेटरी,AFST यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मृणाल परदेशीं यांनी केले. प्रा. भाग्यश्री सरोदे व प्रा श्रद्धा हेरकर यांनी मदत केली. प्रा. सुरेश तोडकर, सहकार्यवाह,पी ई सोसायटी व डॉ. प्रकाश दिक्षीत, उपकार्यवाह, पी. ई. सोसायटी यांनी अभिनंदन केले.