November 22, 2024

Samrajya Ladha

कागदपत्रे अपलोड करा, नॅक चे स्वागत आनंदाने करा: विध्यार्थ्यानी तयार केले सॉफ्टवेअर

गणेशखिंड :

गणेशखिंड येथील मॉडर्न कॉलेजच्या विध्यार्थ्यानी “मिरर “नावाचे सॉफ्टवेअर तयार करून ते आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने कॉलेजला सुपूर्त केले. आज झालेल्या शिक्षक दिनानिमित्त विध्यार्थ्यानी कॉलेजला एक आगळीवेगळी भेट दिली.

कॉम्प्युटर सायन्सच्या सहा विध्यार्थ्यानी NAAC च्या मार्गदर्शन प्रमाणे विभागवार, समितीनुसार, क्रायटेरियानुसार, कार्यालयानुसार विविध कागदपत्रे लगेच अपलोड केल्यास पुढील NNAC पर्यंत ती स्टोअर होतील व त्यानुसार एस एस आरं भरणे सोपे होईल, कॉलेज चे सर्व डोकमेंट्स फोटो व्यवस्थित सादर करता येतील सॉफ्टवेअर तयार केले आहे.

या कार्यक्रमाचे उदघाटन करताना प्राचार्य डॉ संजय खरात म्हणाले,” आमच्या विध्यार्थ्यानी तयार केलेल्या या सॉफ्टवेअरचा डेमो झालेला आहे. हे सॉफ्टवेअर NAAC च्या गाईडलाईन प्रमाणे बदलता येऊ शकेल. आज आमच्या विध्यार्थ्यांनि अतिशय मौल्यवान भेट दिलेली आहे. याचा वापर आम्ही 2 ऑक्टोबर पासून करणार आहोत. हे सॉफ्टवेअर प्रत्येक ऑटोनोमस कॉलेज, मॅनेजमेन्ट इस्टिटयूट वापरू शकेल.याचे पटेन्ट रजिस्टरची प्रक्रिया सुरु आहे.”

प्रा. विजया कुलकर्णी, डेटा वेरिफिकेशन अँड व्हॅलिडेशन समिती प्रमुख म्हणाल्या, ” नॅकची प्रक्रिया आता सुरळीतपणे पार पडेल. सर्व डोकमेंट्स तयार असतील. या शिवाय आम्ही कॉलेजला ‘ मिरर डिजिटल आरकाई ‘दिले आहे. यात कॉलजेच्या दोन नॅक सायकलचा (दहा वर्षाचा) डिजिटल पूर्ण डेटा आहे. जो पुढे कॉलेजला मार्गदर्शक ठरेलं. “

हे सॉफ्टवेअर
संदिप बिराजदार एमएससी (CS) II
विशाल पवार एमएससी (CS) II
अभिजित साळवे एमएससी(CS) II
शंतनू पंडित एमएससी (सीए) II
व्हिक्टर बीमर एमएससी (सीए) II
आयुष खानापुरे टीवायबीसीए(विज्ञान)
या विध्यार्थ्यानी तयार केले. त्यांना या प्रा रंजना शेवकर, प्रा. ऋतुजा मोकाशी, प्रा. ऐश्वर्या नाईक प्रोफेसर मार्गदर्शन केले.

प्रा. सुरेश तोडकर, सहकार्यवाह व डॉ प्रकाश दीक्षित उपकार्यवाह या प्रसंगी उपस्थित होते. या कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ शुभांगी जोशी, डॉ ज्योती गगनग्रास, प्रो स्वाती कंधारकर व डॉ रवींद्र क्षीरसागर उपस्थित होते. प्रा रंजना शेवकर, प्रा ऋतुजा मोकाशी, प्रा ऐश्वर्या नाईक, डॉ पल्लवी निखारे यांनी साहाय्य केले.

याच बरोबर आज मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड पुणे आणि इंडियन रेड क्रॉस सोसायटी, पुणे जिल्हा शाखा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनानिमित्ताने इंडियन सोसायटीचा परिचय आणि प्रतिज्ञा या विषयावर एक उपक्रम पर पडला.

यावेळी विषय तज्ञ प्राचार्य आर. व्ही. कुलकर्णी, मानद सचिव, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, पुणे म्हणाले, “रेड क्रॉस सोसायटीचे कार्य जागतिक पातळीवर सुरू आहे आपत्ती व्यवस्थापन, प्रथमोपचार, पुनर्वसन इत्यादी कार्यात व शांततेच्या काळात विविध प्रकारच्या आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्याचे कार्य करते तसेच समाज उपयोगी आरोग्य, मैत्री आणि सेवा या त्रीसुतरी वापरून मानवतेच्या भावनेतून समाजातील गरजूंपर्यंत युवक पोहोचत आहे”

अलका दळवी, समन्वयक, युथ रेड क्रॉस सोसायटी, यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. संजय खरात, प्रा. पराग शहा यांनी यांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन डॉ. आबासो शिंदे कार्यक्रम समन्वयक व आभार प्रा. पुजा बहिरट यांनी व्यक्त केले.