बाणेर :
पुणे महानगर पालिकेने जाहिर केल्याप्रमाणे मिळकत कर भरणाऱ्या नागरिकांसाठी आकर्षक बक्षीस योजना लॉटरीची सोडत नुकतीच जाहीर झाली यामध्ये बाणेरच्या माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांना पेट्रोल कार बक्षीस मिळाले. परंतु पेट्रोल कार न देता नागरीकांच्या सेवेस उपलब्ध करता येईल अशी ॲम्बुलन्स द्यावी अशी मागणी नगरसेविका ज्योती कळमकर यांनी महापालिकेला पत्र देत केली.
पुणे महानगर पालिकेच्या सोडतीत लॉटरी आम्हाला मिळाली. या मध्ये बक्षिस म्हणून मिळणारी कार न देता बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस, म्हाळुंगे या गावांतील नागरिकांच्या सेवेसाठी ॲम्बुलन्स देण्याची विनंती आयुक्तांना केली आहे. जेणे करून तिचा लाभ परिसरातील नागरीकांना होईल : माजी नगरसेविका ज्योती कळमकर
कळमकर यांनी लॉटरी सोडत मध्ये मिळालेल्या कारच्या बदल्यात नागरीकांच्या सेवेस ॲम्बुलन्स द्यावी अशी विनंती केली आहे. त्यांची मागणी अतीशय चांगली असुन त्याचा सकारात्मक विचार केला जाईल : अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार
आपल्याला मिळालेले बक्षिस जनतेच्या सेवेस उपलब्ध व्हावे असा चांगला प्रयत्न कळमकर यांनी केला आहे. परिसरातील नागरिकांच्या सेवेत काम करताना नागरिकांची वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे सेवा कशी करता येईल हे नेहमीच कळमकर परिवार प्रयत्न करत असतात.
More Stories
बालेवाडी येथे स्त्री फाउंडेशनकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांची सन्मान..
बालेवाडी येथे अमोल बालवडकर फाउंडेशन तर्फे हॅप्पी स्ट्रीट-2024 चे आयोजन…
श्री क्षेत्र बाणेश्वर देवस्थान बाणेर येथे महाशिवरात्र आणि वर्धापन दिन उत्साहात साजरा…