June 4, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने जीवन चाकणकर यांनी भारताने ‘चंद्रयान 3’ मोहीम यशस्वी केल्याचा आनंद उत्सव केला साजरा..

बाणेर :

बाणेर – बालेवाडी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आज भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा ‘चंद्रयान 3’ मोहीम यशस्वी झाल्याबद्दल सर्व शास्त्रज्ञांचे व कर्मचाऱ्यांचे मनापासून अभिनंदन तसेच शुभेच्छा व्यक्त करत बाणेर बालेवाडी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने जीवन चाकणकर(उपाध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी सेल पुणे) यांनी फटाके फोडून परिसरात पेढे मिठाईवाटून आनंद साजरा करण्यात आला.

आपल्या भारताची चंद्रावर स्वारी करण्याची मोहिम अखेर फत्ते झाली. चांद्रयान ३ नं इतिहास रचला असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. ही आपल्या सर्वांसाठीच अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. म्हणूनच मोठे जल्लोषात याचा आनंद उत्सव फटाके फोडून आणि पेढे वाटून करत आहे : जीवन चाकणकर (उपाध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी सेल पुणे)