September 8, 2024

Samrajya Ladha

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यास मान्यता..

मुंबई :

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये सुधारणा करुन सन 2023-24 पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

 

ज्याला 19.04. 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ या योजनेअंतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षातील तरतुदीतून अनुदान मंजूर करण्याची विनंती करण्यात आली आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना
त्यालाचअनुसरुन ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ या योजनेअंतर्गत 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता विभागस्तरावर उपलब्ध असलेला निधी रक्कम 12 कोटी अनुदान शासन निर्णयान्वये वितरीत करण्यात आले आहे. सदर योजनेसाठी 17.45 कोटी अनुदान मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

17.45 कोटींना मान्यता
‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ या योजनेअंतर्गत सन 2023 -24 या आर्थिक वर्षातील तरतुदीतून रु. 17.45 कोटी इतके अनुदान वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. प्रस्तुत खर्च खालील लेखाशिर्षाखाली सन 2023-24 करिता मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतूदीतून भागविण्यात यावा. सदर शासन निर्णयान्वये वितरीत करण्यात येणारा निधी शासन निर्णयात नमूद तरतूदीनुसार खर्च करण्याची जबाबदारी आयुक्त (कृषि) यांची राहील. उपरोक्त प्रमाणे उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या निधीच्या विनियोगाबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र आयुक्त (कृषि) शासनास सादर करतील.