May 23, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सचिन दळवी सोशल फाउंडेशनच्या दिनदर्शिका २०२५ चे प्रकाशन राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील व केंद्रीय राज्यमंत्री मा.श्री. मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते संपन्न..

सोमेश्वरवाडी :

सचिन दळवी सोशल फाउंडेशनतर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखिल नागरिकांसाठी दिनदर्शिका २०२५ उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या दिनदर्शिकेचे प्रकाशन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा मा.ना. आमदार श्री. चंद्रकांत दादा पाटील व केंद्रीय राज्यमंत्री मा.श्री. मुरलीधर (आण्णा) मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले.

 

सचिन दळवी यांनी नेहमीच जनसेवेचे धोरण अवलंबिले असून विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांची सेवा केली आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये दिनदर्शिकेचे महत्व जाणून ती सहज नागरीकांना उपलब्ध व्हावी म्हणून ते अतीशय सुरेख दिनदर्शिका दरवर्षी उपलब्ध करुण देत असतात. दळवींच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक वाटते. दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले असे मी जाहीर करतो.
नामदार चंद्रकांत दादा पाटील
उच्च तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य

सचिन दळवी हा आमचा होतकरू कार्यकर्ता असून सतत वेगवेगळे उपक्रम राबवत कार्यरत आहे. एक चांगल्या प्रकारची, नागरीकांना उपयोगी पडेल अशी माहिती असलेली दिनदर्शिका उपलब्ध करून देत चांगला उपक्रमातून नागरिकांची सेवा सचिन करतो याचे कौतुक वाटते.
मुरलीधर मोहोळ
केंद्रिय राज्यमंत्री

यावेळी कोथरूड विधानसभा उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, सरचिटणीस मोरेश्वर बालवडकर, युवा मोर्चा अध्यक्ष रोहन कोकाटे, कैलास मोहोळ, दिलीप सुतार उपस्थित होते.