बाणेर :
मौजे बाणेर येथील स.नं.६६ येथे पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉ.लि. यांच्या माध्यमातून अग्निशामक केंद्र उभारण्यात आलेले आहे. सदर अग्निशामक केंद्राचे काम सुमारे १ वर्षापूर्वी पूर्ण होऊन हे केंद्र पुणे महानगरपालिकेला हस्तांतरित देखील केले गेलेले आहे. २ अग्निशामक गाडी क्षमता असलेले हे अग्निशामक केंद्र अजूनही बंद अवस्थेत आहे. ते सुरू करावे म्हणून तसे निवेदन माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी आयुक्तांना दिले.
बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुस-म्हाळुंगे हा भाग अतिशय झपाट्याने वाढत असताना या भागातील गृहनिर्माण संस्था, लोकवस्ती तसेच लोकसंख्या देखील वेगाने वाढत आहे. लाखोंच्या संख्येने लोक या भागात राहत आहेत. या परिसरातील नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी हे अग्निशामक केंद्र तातडीने सुरु होणे गरजेचे आहे. या भागात उंच इमारती (हाय राईज बिल्डींग) असून या भागाकरिता अत्याधुनिक अशा उंच शिडीच्या २ अग्निशामक गाड्या (फायर वेहिकल) आणि तसेच अधिकारी व कर्मचारी यांची आवश्यकता आहे. तरी या गोष्टी तातडीने उपलब्ध करून हे अग्निशामक केंद्र सुरु करावे.
या बाबतचे निवेदन मा.नगरसेवक श्री.अमोल भैया बालवडकर यांनी मा.आयुक्तांना प्रत्यक्ष भेटून दिले. यावर तातडीने तरतूद उपलब्ध करून देऊन हे “अग्निशामक केंद्र” लवकरच सुरु करण्यात येईल असेल मा.आयुक्तांनी आश्वस्त केले.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!