July 22, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

29 व्या राष्ट्रीय जूनियर कॉर्फबॉल स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाने पटकावला तृतीय क्रमांक…

पुणे :

रुद्रपुर उत्तराखंड येथे 29 डिसेंबर 2024 ते एक जानेवारी 2025 पार पडलेल्या 29 व्या राष्ट्रीय जूनियर कॉर्फबॉल स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाने हिमाचल प्रदेश संघाचा 17-14 असा तीन गुणांनी पराभव करून तृतीय क्रमांक पटकावला.

 

यामध्ये कर्णधार संस्कृती पाटील, उप कर्णधार स्तवन प्रभू , सई मोहिते, अनुष्का शिंदे, सेजल नाईक, कुणाल लोळगे, आर्यन देवधर, आयुष जावळकर, अनुष्का घाडगे, मृण्मयी वायाळ, तनिष्का बंगेरिया, ओमकार गावडे, सचिन चव्हाण, अद्वैत राऊत यांनी उत्कृष्ट खेळ केला.

तत्पूर्वी झालेल्या साखळी स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाने कर्नाटक संघाचा 19-01 असा मोठ्या फरकाने पराभव केला. तसेच दिल्ली संघाचा 10-07 असा तीन गुणांनी पराभव केला. उपांत्य पूर्व सामन्यात झारखंड संघाचा 14-0 1 असा पराभव केला. उपांत्य सामन्यामध्ये महाराष्ट्र संघाला केरळ संघाकडून 10-07 पराभव पत्करावा लागला. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यामध्ये महाराष्ट्र संघाने हिमाचल प्रदेश संघाचा 17- 14 असा तीन गुणांनी पराभव केला.

महाराष्ट्र महाराष्ट्र संघाला प्रशिक्षक म्हणून प्राध्यापक सचिन कुमार ववले व संघ व्यवस्थापक सोनाली ववले, तसेच महाराष्ट्र कॉर्बल संघटनेचे उपाध्यक्ष श्री प्रवीण मानवटकर सचिव श्री किशोर बागडे निवड समिती प्रमुख लेफ्टनंट डॉक्टर ज्ञानेश्वर चिमटे यांचे मार्गदर्शन लाभले.

You may have missed