औंध :
स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 च्या अनुषंगाने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाने मागील सप्ताहामध्ये ठिकठिकाणी डीप क्लिनिंग ड्राईव्ह राबविण्यात आलेले होते. यामध्ये औंध बाणेर बालेवाडी पाषाण या भागातील सूक्ष्म/खोलवर स्वच्छतेचे नियोजन करून मोठ्या प्रमाणात स्वच्छता करण्यात आलेली होती.
मात्र 31 डिसेंबर नवीन वर्षाच्या सुरुवातीचा उत्साह साजरा करण्याच्या नादात काही व्यक्तींकडून रस्त्यावर कचरा टाकणे, रस्त्यावर थुंकणे, कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणे, सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकणे असे प्रकार सातत्याने पुन्हा होत असल्याने मा. उप आयुक्त घनकचरा व्यवस्थापन श्री. संदीप कदम, मा. उप आयुक्त परिमंडळं क्र. 2 श्री. अविनाश सकपाळ, मा. महापालिका सहाय्यक आयुक्त श्री. गिरीष दापकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री विजय भोईर यांच्या नियंत्रणाखाली सर्व आरोग्य निरीक्षक यांनी 27 व्यक्ती यांचेवर दंडात्मक कारवाई करून रक्कम रुपये 79,900/- दंड वसुल केला.




























More Stories
कोथरूड विधानसभा मधील पाषाण-सुतारवाडी लिंक रोड वरील कचऱ्यावरून राजकारण पेटले! अमोल बालवडकरांच्या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे; पण तत्परता फक्त ‘खास’ भागापुरतीच का?
सुस परिसर वाहतूक कोंडीबाबत अनिकेत चांदेरे यांच्याकडून वाहतूक पोलिसांना निवेदन
मैत्रीचा धागा, विश्वासाचे नाते! युवा स्पंदनतर्फे चतुःश्रुंगी व कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये फ्रेंडशिप डे उपक्रम