पुणे :
पाषाण, सुस, म्हाळुंगे, बावधन, परिसरातील विविध विकास कामांना निधी उपलब्ध व्हावा म्हणून पुणे महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले साहेब यांची भेट घेऊन भोर-राजगड-मुळशी चे आमदार शंकर मांडेकर यांनी सविस्तर चर्चा केली.
आगामी महापालिका अर्थ संकल्पात सदर रस्ते, ड्रेनेज लाईन, पाणीपुरवठा योजना, स्ट्रीट लाईट कामांना निधी मंजूर करण्यात येईल असे महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी यावेळी सांगितले.
निवडून आल्यानंतर पाषाण, सुस, म्हाळुंगे, बावधन, परिसरातील विविध विकास कामे कशी मार्गी लावता येईल यासाठी आमदार शंकर भाऊ मांडेकर यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
यावेळी माजी नगरसेवक प्रमोद आण्णा निम्हण, युवराज कोळेकर, सुर्यकांत भुंडे, दिपक दगडे, अभिजित दगडे, समिर कोळेकर, पांडुरंग पाडळे यांच्यासह विविध मान्यवर व महापालिका विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी