विद्यापीठ :
कला-क्रीडा,संगीत,नृत्य यांचा त्रिवेणी संगम म्हणजे प्रशालेचे स्नेहसंमेलन. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विद्यापीठ हायस्कूल प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ नुकताच राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र येथे सेवा संत संघाचे विश्वस्त योगेशजी थत्ते व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.संदीपजी सांगळे, एन.सी.सी.एस.चे संचालक डॉ.शर्मिला बापट, जी.हरी कुमार यांच्या हस्ते पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने व महर्षी कर्वे, बाया कर्वे, भारतमाता यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. वर्षभर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांमधून उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
विविध वेशभूषा धारण करून नृत्य व अभिनयाचे सादरीकरण करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्राची लोकधारा, गणेश वंदना, दीप नृत्य, देशभक्तीपर गीतावर आधारित नृत्य, शास्त्रीय नृत्य, लोकप्रिय खेळ क्रिकेट यावर आधारित नृत्य, फॅशन शो व विशेष आकर्षण म्हणजे योगाचे प्रात्यक्षिक सादरीकरण करण्यात आले. आनंदमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना भरभरून दाद मिळाली. विद्यार्थ्यांनी कला सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. विद्यार्थ्यांचा व पालकांचा उत्स्फूर्त सहभाग व प्रतिसाद होता. तसेच *सार्थक गोरे, चैतन्य मगर व मुनेश राठोड या विद्यार्थ्यांना डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम बेस्ट स्टुडंट एक्सलन्स अवॉर्ड -२०२४* देऊन गौरवण्यात आले.
मुख्याध्यापक विष्णू मोरे यांनी प्रास्ताविक तर स्नेहसंमेलनाचे कार्याध्यक्षा गौरी गोळे यांनी वर्षभराच्या शालेय कार्याचा आढावा अहवाल वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वैशाली सैंधाणे यांनी तर आभार योगेश चव्हाण यांनी केले.क्रीडा प्रतिनिधी मनोहर निकम, शिक्षकेत्तर प्रतिनिधी मंदाकिनी काशीद, विद्यार्थी प्रतिनिधी चैतन्य मगर व तेजस्विनी गरड, पालक संघाचे प्रतिनिधी आनंद कवठेकर व भाग्यश्री मासाळ उपस्थित होते.



More Stories
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीचा मेणबत्ती मोर्चा
गायनातून भाव व्यक्त होणे अत्यावश्यक : पं. उपेंद्र भट सोमेश्वर फाउंडेशनतर्फे २४ व्या ‘पुणे आयडॉल- 2026’ स्पर्धेचे उद्घाटन