बावधन :
8 डिसेंबर पुणे, येथे झालेल्या पूनावाला फिंनकॉर्प प्रेजेंट सकाळ स्कूलिंपिक्स 2024, महिला कुस्ती स्पर्धेत पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज बावधन येथील इयत्ता नववीत शिकणारी विद्यार्थीनी अंतरा दिपक कंधारे हीने महिला कुस्ती स्पर्धेत पुणे विभागातून रौप्यपदक पटकावले.
विद्यार्थ्यांना पेरिविंकल स्कूलमध्ये केवळ शिक्षणच नव्हे तर इतर सुप्त गुण वाढीस लागण्यासाठी शाळा नेहमीच प्रयत्नशील असते व तसे प्रोत्साहन मुलांना नेहमीच दिले जाते. विद्यार्थ्यांमधील इतर कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेतील शिक्षक नेहमीच अविरतपणे झटत असतात.
यावेळी चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संस्थापक श्री. राजेंद्र बांदल सर व संचालिका सौ. रेखा बांदल व तडफदार संचालिका कु.शिवानी बांदल यांनी अंतराचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित पर्यवेक्षिका कल्याणी शेळके, शिरीन काझी यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.
More Stories
म्हाळुंगे टीपी स्कीमसाठी अमोल बालवडकर यांचे मुख्यमंत्री यांना निवेदन; प्रलंबित प्रकल्पाला गती देण्याची मागणी..
बाणेर च्या योगीराज नागरी सहकारी पतसंस्थेचा २९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा….
सुस येथील बेला कासा सोसायटीतील मिळकत कराच्या समस्यांचे अमोल बालवडकर यांच्या माध्यमातून निराकरण