बाणेर :
बाणेर येथे जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन आणि ब्ल्यू ब्रिगेड च्या वतीने बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे, पाषाण आणि परिसरातील सर्व नागरिकांसाठी यावर्षी देखील भव्य मॅरेथॉन स्पर्धा ‘फॅमिली रन 3.0’ आयोजन करण्यात आले आहे.
मागील वर्षी देखील नागरिकांनी आपल्या परिवारासह या भव्य मॅरेथॉन स्पर्धेत मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता. या फॅमिली रन माध्यमातून संपूर्ण परिवाराला एकत्रित रित्या आरोग्याचा दृष्टिकोन समोर ठेऊन धावता यावे म्हणुन भव्य मॅरेथॉन आयोजित केली जाते. माझे परिसरातील नागरिकांना आवाहन आहे की, चला बदलाचे साक्षीदार होऊया, निरोगी आयुष्य जगूया, पर्यावरणाचे संरक्षण करूया. मोठ्या संख्येने मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घ्या.
– जयेश मुरकुटे ( संस्थापक अध्यक्ष: जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन)
या फॅमिली रन मध्ये ३ किमी, ५ किमी, १० किमी अशा विविध विभागात स्पर्धक सहभागी होऊ शकतात. यावेळी पाच लकी ड्रॉ विजेत्यांना सायकल तसेच अनेक आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहे.
या स्पर्धेसाठी रजिस्ट्रेशन फी : ₹100
(टी-शर्ट, बिब, फिनिशर मेडल, सर्टिफिकेट, झुंबा, योगा कुलडाऊन, ब्रेकफास्ट, एनर्जी ड्रिंक आणि अनमोल अनुभव…)
स्पर्धेचे ठिकाण : माऊली पेट्रोलियम जवळील ग्राउंड, बाणेर रोड, बाणेर, पुणे.
दिनांक : 22 डिसेंबर 2024
वेळ : सकाळी 6 वाजता
संपर्क :
जयेश मुरकुटे : 7709775034
अजय देसाई : 9766353337




























More Stories
कोथरूड विधानसभा मधील पाषाण-सुतारवाडी लिंक रोड वरील कचऱ्यावरून राजकारण पेटले! अमोल बालवडकरांच्या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे; पण तत्परता फक्त ‘खास’ भागापुरतीच का?
सुस परिसर वाहतूक कोंडीबाबत अनिकेत चांदेरे यांच्याकडून वाहतूक पोलिसांना निवेदन
मैत्रीचा धागा, विश्वासाचे नाते! युवा स्पंदनतर्फे चतुःश्रुंगी व कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये फ्रेंडशिप डे उपक्रम